Suzuki Electric Scooter: सुझुकीची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर थोड्याच वेळात लाँच होणार; OLA, टीव्हीएस टेन्शनमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 01:02 PM2021-11-18T13:02:11+5:302021-11-18T13:08:02+5:30

Suzuki Upcoming Scooter launch Today : ओला आणि अन्य इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीच्या रेंजमध्येच सुझुकीची स्कूटर येण्याची शक्यता आहे.

Suzuki's first electric scooter will be launched Today; OLA, in TVS Tension | Suzuki Electric Scooter: सुझुकीची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर थोड्याच वेळात लाँच होणार; OLA, टीव्हीएस टेन्शनमध्ये 

Suzuki Electric Scooter: सुझुकीची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर थोड्याच वेळात लाँच होणार; OLA, टीव्हीएस टेन्शनमध्ये 

googlenewsNext

सुझुकी मोटरसाइकिल इंडिया भारतात आज नवीन स्कूटर लाँच करणार आहे. ही स्कूटर अशासाठी खास आहे कारण ती इलेक्ट्रीक असणार आहे. कंपनीने स्कूटरच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र, ही स्कूटर बजाज चेतक (Bajaj Chetak) आणि ओला एस१ (Ola S1) स्कूटरला टक्कर देण्यासाठी एका बॅटरीने लेस असेल. नावाची घोषणा केली नसली तरी एका झलक दिसणारा फोटो प्रसिद्ध केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार स्कूटर एक स्पोर्टी स्टाईलमध्ये असेल. हँडलबारवर ब्लिंकर्स लागलेले असतील. पुढील भागात फ्रंट मेन हेडलँप असेम्ब्ली देण्यात आली आहे. सोबतच डार्क कलर थीमच्या बेसवर नियॉन येलिश हायलाईटचा वापर केला आहे. यामुळे टू-व्हीलरच्या अँग्युलर डिझाईनचा लूक येणार आहे. ही बर्गमॅन मॅक्सी स्कूटरचे इलेक्ट्रीक व्हर्जन असेल असे रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे. मात्र, याची शक्यता कमी आहे. 

याशिवाय या स्कूटरवर पूर्णपणे डिजिटल डिस्प्ले असेल, असे समोर आलेल्या टीजरवरून समजते. हा डिस्प्ले स्मार्टफोनद्वारे ब्ल्यूटूश कनेक्ट केला जाऊ शकतो. याद्वारे स्कूटर अनेक बाबतीत कनेक्ट राहणार आहे. ड्रायव्हिंग रेंज आणि किंमतीची गोष्ट करायची झाल्यास, या इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज 100 ते 150 किमीच्या आसपास असेल. ही स्कूटर अधिकृतरित्या 18 नोव्हेंबरला लाँच केली जाईल असे कंपनीने म्हटले आहे. सध्या भारतीय बाजारात ओला एस१ आणि टीव्हीएस आयक्यूब या स्कूटर प्रसिद्ध आहेत. यापैकी टीव्हीएसची स्कूटर रस्त्यांवर धावतेय तर ओलाची स्कूटर यायला अजून वेळ आहे. सध्या तिची टेस्ट राईड दिली जात आहे. 

ओला आणि अन्य इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीच्या रेंजमध्येच सुझुकीची स्कूटर येण्याची शक्यता आहे. भारतात लाँच होणारी ही स्कूटर 1 लाख ते 1.20 लाख रुपयांच्या आसपास किंमत ठेवून स्पर्धात्मक ठेवली जाईल. 

संबंधीत बातम्या...

OLA Electric Scooter मध्ये सारे काही आलबेल? क्वालिटी हेडचा तडकाफडकी राजीनामा 

Ola Electric Scooter Booking: ओला आणखी एक संधी देणार! इलेक्ट्रीक स्कूटरची या तारखेला पुन्हा बुकिंग सुरु करणार

Web Title: Suzuki's first electric scooter will be launched Today; OLA, in TVS Tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.