तरुणांसाठी नवीन स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईक येणार, 110 Kmph असणार टॉप स्पीड!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 07:43 PM2022-04-27T19:43:35+5:302022-04-27T19:44:14+5:30

Svitch CSR 762 electric bike : कंपनीने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक बाईकचा टॉप स्पीड 110 किमी प्रतितास असेल, तर ती 120 किमीची रेंज देईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या बाईकचा व्हीलबेस 1,430 मिमी असेल आणि बाईकचे वजन 155 किलो आहे.

Svitch CSR 762 electric bike India launch in August: Offers 120 km range | तरुणांसाठी नवीन स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईक येणार, 110 Kmph असणार टॉप स्पीड!

तरुणांसाठी नवीन स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाईक येणार, 110 Kmph असणार टॉप स्पीड!

googlenewsNext

नवी दिल्ली : नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक Svitch MotoCorp भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करणार आहे. या बाईकचे नाव CSR 762 असे म्हटले जात आहे. ही बाईक यावर्षी जुलै-ऑगस्टपर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. CSR 762 एक पॉवरफुल 3 kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालवली जाणारी बाईक असणार आहे. यामध्ये 3.7 kWh चा बॅटरी पॅक दिला जाणार आहे. CSR 762 ची किंमत जवळपास 1.65 लाख रुपये असेल (सब्सिडी वगळून). मात्र, कंपनी या बाईकवर 40,000 रुपयांपर्यंत सब्सिडी लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कंपनीने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक बाईकचा टॉप स्पीड 110 किमी प्रतितास असेल, तर ती 120 किमीची रेंज देईल. इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या बाईकचा व्हीलबेस 1,430 मिमी असेल आणि बाईकचे वजन 155 किलो आहे. बाईकच्या सीटची उंची 780 मिमी असणार आहे. याशिवाय बाईकमध्ये 6 रायडिंग मोड्स पाहायला मिळतील. तसेच, ब्रँड अधिक व्यावहारिकतेसाठी बॅटरी स्वॅपिंग जॉइंट्स स्थापित करण्यास उत्सुक आहे.

'सर्वसामान्यांसाठी लक्झरी बाईक आहे'
CSR 762 च्या आगामी लॉन्च बद्दल बोलताना स्विचचे संस्थापक राजकुमार पटेल म्हणाले, "आम्ही भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला इलेक्ट्रिक बदलासह सुधारण्याचे ध्येय ठेवले आहे. CSR 762 एक कंप्लिट ऑन-रोड राइडिंग अनुभव देते. सर्वसामान्यांसाठी ही खऱ्या अर्थाने लक्झरी बाईक आहे. CSR 762 तयार करण्याचा उद्देश बाइकिंग उत्साही व्यक्तींना लक्झरी, स्टाइल आणि सस्टेनेबिलीटी देणे हा आहे."

25 एप्रिलपासून या इलेक्ट्रिक बाईकचे बुकिंग 
Revolt Motors ने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक RV400 चे बुकिंग सुरु केले आहे. 25 एप्रिलपासून 20 शहरांमध्ये याची सुरुवात झाली आहे. ग्राहक रिव्हॉल्ट मोटर्सच्या वेबसाइटवर लॉग इन करू शकतात आणि 9,999 रुपये भरून ते बुक करू शकतात. रिव्हॉल्ट मोटर्सचे नेटवर्क वाढवण्याची आणि 40 हून अधिक डीलरशिप उघडण्याची योजना आहे.
 

Web Title: Svitch CSR 762 electric bike India launch in August: Offers 120 km range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.