तरुणांना वेड लावेल 'ही' इलेक्ट्रिक बाईक; 40 हजार रुपयांची मिळेल सबसिडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 12:03 PM2022-06-02T12:03:17+5:302022-06-02T12:03:55+5:30
Svitch CSR 762 Electric Motorcycle : कंपनी 2022 मध्ये CSR 762 प्रकल्पावर 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. CSR 762 ची डिझाइन एशियाटिक लायन्स म्हणजेच सिंहापासून प्रेरित आहे.
नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस नवीन स्टार्टअप्स एकापेक्षा एक उत्तम इलेक्ट्रिक वाहने घेऊन येत आहेत. विशेषत: इलेक्ट्रिक टू-व्हिलर तयार करण्यात कंपन्यांचा जोर दिसून येत आहे. अशाच एका नवीन स्टार्ट स्विच मोटोकॉर्पने CSR 762 नावाची नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च केली आहे. या ई-बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.65 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, यावर ग्राहकांना 40,000 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. कंपनी 2022 मध्ये CSR 762 प्रकल्पावर 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. CSR 762 ची डिझाइन एशियाटिक लायन्स म्हणजेच सिंहापासून प्रेरित आहे.
स्विच CSR 762 सोबत 3.7 kW-hr लिथियम-आयन बॅटरी पॅक जोडण्यात आले आहे, जे 10 kW पॉवर आणि 56 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही बॅटरी स्वॅपही करता येते. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल कम्बाइंड चार्जिंग सिस्टीम म्हणजेच सीसीएस बॅटरी चार्जरच्या मदतीने देखील चार्ज करता येते. सिंगल चार्जमध्ये, ही इलेक्ट्रिक बाइक 110 किमी पर्यंत चालवता येते आणि तिचा टॉप स्पीड 120 किमी / तास आहे.
3 राइडिंग मोड्स
CSR 762 सोबत कंपनीने स्पोर्ट, रिव्हर्स आणि पार्किंग असे 3 राइडिंग मोड्स दिले आहेत आणि हे मोड्स सर्वसाधारणपणे ई-बाईकसह उपलब्ध करून दिले आहेत. या मोटरसायकलला सेंट्रल ड्राईव्ह सिस्टीमसह शक्तिशाली 3 किलोवॅट क्षमतेची पर्मनेंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर देण्यात आली आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक मोटरसायकलसह 5-इंचाचा टीएफटी कलर डिस्प्ले आणि ओव्हरहिटिंग टाळण्यासाठी थर्मोसिफोन कुलिंग सिस्टम देखील देण्यात आले आहे.