जबरदस्त मायलेज आणि फीचर्स, मारुती सुझुकीची लोकप्रिय कार स्विफ्ट S-CNG सोबत लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 12:58 PM2022-10-21T12:58:24+5:302022-10-21T13:00:17+5:30
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचं सीएनजी व्हर्जन लाँच केलं आहे.
मारुती सुझुकीच्या सीएनजी कार्स या अन्य कंपन्यांच्या सीएनजी कार्सच्या तुलनेत उत्कृष्ट मानल्या जातात. जबरदस्त मायलेजसाठी या कार्स ओळखल्या जातात. अशातच आता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचं सीएनजी व्हर्जन लाँच केलं आहे. याचचं नाव स्विफ्ट एस-सीएनजी असं आहे. स्विफ्टचं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच झाल्यानंतर अनेक लोक या कारची वाट पाहत होते. कंपनीनं ही कार VXi आणि ZXi या दोन व्हेरिअंटमध्ये सादर केली आहे. ही भारतातील सर्वात पॉवरफुल सीएनजी हॅचबॅक कार आहे. कंपनीनं नव्या स्विफ्ट एस-सीएनजीसाठी #BeLimitless अशी टॅगलाईनही वापरली आहे. सातत्यानं नवं काही करण्याची ओढ असणारे 20 ते 30 या वयोगटातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी ही कार सज्ज झाली आहे.
स्विफ्ट एस-सीएनजी त्याच 1.2-लिटर, 4-सिलिंडर, नॅचरली एस्पिरेटेड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन मारुती सुझुकीच्या ड्युएलजेट, के-सीरीज इंजिन श्रेणीतील आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 89 PS ची मॅक्सिमम पॉवर आणि 4,400 rpm वर 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. CNG वर असताना ही कार 6,000 rpm वर 77.49PS ची पॉवर आणि 4300 rpm वर 98.5Nm चा टॉर्क जनरेट करते. स्विफ्ट एस-सीएनजी ही कार 30.90 किमी/किलो# चं मायलेज देते. इंजिनप्रमाणेच या कारमध्ये देण्यात आलेली फीचर्सही जबरदस्त आहे. यामध्ये ग्राहकांना मस्क्युलर बॉनेट, ब्लॅक-आऊट हनीकॉम्ब मेश ग्रिल आणि रुफ माऊंटेड अँटिना पाहायला मिळतो.
लायटिंग फीचर्सबद्दल सांगायचं झालं तर डीआरएलसह प्रोजेक्टर एलईडी हेडलाईट्स आणि रॅप-अराऊंड एलईडी टेललाईट्स देण्यात आले आहेत. याशिवाय कारमध्ये व्हायब्रंट पेंट स्कीम, 15 इंचाचे अलॉय व्हिल्स आणि विंडो वायपर्सचा समावेश करण्यात आलाय. तर दुसरीकडे सेफ्टी फीचर्समध्ये यात ड्युअल एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी आणि रिअर व्ह्यू कॅमेराही दिला आहे. मारुती सध्या आपल्या एकूण अनेक मॉडेल्सची सीएनजी व्हेरिअंटमध्ये विक्री करते. यामध्ये ऑल्टो, वॅगनआर, सेलेरिओ, डिझायर, अर्टिगा, सुपर कॅरी, ईको, टूर-एससारख्या मॉडेल्सचा समावेश आहे.
Disclaimers:
#As certified by Test Agency Under Rule 115 ( G) of CMVR 1989
*Claim is subjected to the JATO Dynamics Fuel Efficiency Data.