स्विफ्टची हायब्रिड भारतात येणार, पण कधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 03:44 PM2018-08-07T15:44:49+5:302018-08-07T15:45:37+5:30
पेट्रोलला 32 किमीचे मायलेज देत असल्याने 'किती देते ' म्हणणाऱ्या वाहनप्रेमींना उत्सुकता
भारतामध्ये कमालीची लोकप्रिय ठरलेल्या स्विफ्ट या हॅचबॅच श्रेणीतील कारचे हायब्रिड मॉडेल इंडोनेशियामध्ये एका ऑटो एक्स्पो दाखिविण्यात आले. पेट्रोलला 32 किमीचे मायलेज देत असल्याने 'किती देते ', असे म्हणणाऱ्या भारतीय बाजारपेठेत कधी दाखल होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
स्विफ्टचे तिसरे अद्ययावत केलेले मॉडेल काही महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारात आणण्यात आले. अॅव्हरेज चांगले मिळण्यासाठी तब्बल 100 किलोंनी तिचे वजन घटविले गेले. सुझुकीचे जन्मस्थळ असलेल्या देशात ती साधारण वर्षभरापूर्वीच उतरविण्यात आली. मात्र, भारतात यायला वेळ लागला. स्विफ्टचे हायब्रिड मॉडेलही गेल्यावर्षीच जुलै महिन्यामध्ये जपानच्या बाजारात उतरविण्यात आली. मात्र, ती भारतात येणार का, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नसल्याने भारतीय वाहन प्रेमींना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
दरम्यान, 2020 मध्ये सुझुकी आपली पहिली विजेवर चालणारी कार भारतात लाँच करणार आहे. तसेच सध्या असलेल्या कार वायू उत्सर्जन कायद्यामुळे स्मार्ट इलेक्ट्रीक करण्यावर भर राहणार आहे.