उन्हाळ्यात अशाप्रकारे घ्या तुमच्या कारची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 02:22 PM2018-04-05T14:22:18+5:302018-04-05T14:22:18+5:30
आग ओकणारा उन्हाळा सुरु झाला असून पुढील महिन्यापासून उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे. अशात आरोग्याची काळजी घेणं तर गरजेचं आहेच.
उन्हाळा सुरु झाला असून पुढील महिन्यापासून उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे. अशात आरोग्याची काळजी घेणं तर गरजेचं आहेच. सोबतच या दिवसात आपल्या कारची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. या दिवसात गाडीची योग्य काळजी न घेतल्यास तुम्हाला ते महागात पडण्याची शक्यता असते. त्यामुळे गाडीची काळजी घेण्याच्या काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कूलंटवर द्या लक्ष
अनेकांना हे माहिती नसतं की, उन्हाळ्यात सर्वात जास्त गाडीतील कूलंट लिक्वीडवर लक्ष दिलं पाहिजे. उन्हाळ्यात कार गरम झाल्यावर ती थंड करण्यात कूलंट फार महत्वाची भूमिका बजावतं. इंजिन जास्त गरम झालं तर कार बंद पडणार. त्यामुळे या दिवसात कूलंटची लेव्हल चेक करत राहणं आणि ते कमी झाल्यास रीफिल करणं गरजेचं आहे.
टायर प्रेशरची घ्या काळजी
उन्हाळ्यात टायर्समध्ये हवेचं प्रेशर वाढतं. याकारणाने टायर फुटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात रोज टायरमधील हवेचं प्रेशर चेक केलं पाहिजे. कारच्या मॅन्यूअलमध्ये देण्यात आलेल्या गाईडलाईन फॉलो केल्या पाहिजे.
इंजिनचे बेल्ट
कारच्या इंजिनात अनेक प्रकारच्या बेल्ट्सचा वापर केलेला असतो. हे बेल्ट रबरचे बनवलेले असतात आणि या दिवसात गरमीमुळे सैल होऊ शकतात. त्यामुळे वेळोवेळी हे बेल्ट्स चेक केले पाहिजे.
एअर कंडिशनची सर्व्हिसींग
या दिवसात कारमध्ये एसी सर्वात गरजेचा असतो. जर एसी चांगल्याप्रकारे काम करत नसेल तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. जर तुमची कार जुनी झालेली असेल तर आधीच कारचा एसी चेक करुन घ्या.
इंजिन ऑईल करा चेक
इंजिन ऑईल हे कारमध्ये लूब्रिकेशनचं काम करतं. पण उन्हाळ्यात गरमीमुळे ऑईलचा चिकटपणा कमी होतो. यामुळे इंजिनाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच वेळोवेळी इंजिन ऑईल चेक करणं गरजेचं आहे.
कारच्या पेंटची अशी घ्या काळजी
या दिवसात उन्हात कार उभी केल्याने कारचा रंग फिक्का पडू शकतो. त्यासोबतच धूळ, माती आणि प्रदूषणामुळेही कारच्या रंगाचं नुकसान होऊ शकतो. यासाठी कारची वेळोवेळी प्रेशर वॉशिंग केलं पाहिेजे. शक्य झाल्यास कार सावलीत उभी करा. त्यासोबतच कार कपड्याने झाकून ठेवा.
वायपर आणि विंडशील्ड
उन्हाळ्यात खासकरुन कारचे वायपर पिघळतात आणि विंडशील्डचंही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वेळोवेळी ते चेक करत राहणं गरजेचं आहे.