ग्राहकांना टाटा मोटर्सकडून मोठी भेट; Tata 407 आता CNG मध्येही उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:11 PM2021-09-14T13:11:29+5:302021-09-14T13:11:45+5:30

Tata 407 CNG: आजवर 407 टेम्पोचे 1.2 दशलक्ष युनिट्स विकले गेले आहेत. डिझेल व्‍हेरिएण्‍टच्या तुलनेत 35 टक्क्यांपर्यंत अधिक नफा कमावता येऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे. 

Tata 407 CNG variant light commercial vehicle launched at Rs 12.07 lakh | ग्राहकांना टाटा मोटर्सकडून मोठी भेट; Tata 407 आता CNG मध्येही उपलब्ध

ग्राहकांना टाटा मोटर्सकडून मोठी भेट; Tata 407 आता CNG मध्येही उपलब्ध

googlenewsNext

भारतातील सर्वात मोठी कमर्शिअल वाहनांची निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपल्या ताफ्य़ात आता सीएनजीवर चालणारे टेम्पो आणण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मालवाहतूकदार वाहन मालकांचे डिझेलवर खर्च होणारे भरमसाठ पैसे वाचणार आहेत. टाटाने Tata 407 या मध्यम स्वरुपाच्या टेम्पोचे CNG व्हेरिअंट लाँच केले आहे. (Tata 407 CNG light commercial vehicle launched in India.)

Tata 407 चे सीएनजी व्हेरिअंट डिझेलवरील पैसे वाचविणार आहे, तसेच परफॉर्मन्सही चांगला देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नव्या सीएनजी व्हेरिअंटची पुण्यातील एक्स शोरुम किंमत 12.07 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 3.8 लीटर क्षमतेचे सीएनजी इंजिन आहे. इंधन कार्यक्षम एसजीआय इंजिन तंत्रज्ञानाचा लाभ यामध्ये देण्यात आला आहे. हे इंजिन 85 पीएस एवढी कमाल ऊर्जा निर्माण करते. त्याचप्रमाणे कमी आरपीएमवर 285 एनएम टॉर्कही निर्माण करते. १८० लीटर क्षमतेची इंधनटाकी असून, यामुळे टर्नअराउंड कालावधी कमी होऊन उत्पादनक्षमता वाढणार आहे. 407 फ्रण्ट पॅराबोलिक सस्पेन्शनवर चालते. यामुळे क्लच व गिअर बदलण्यातील कष्ट लक्षणीयरित्या कमी होतात आणि एनव्हीएच स्तरही कमी राहतात. 

आजवर 407 टेम्पोचे 1.2 दशलक्ष युनिट्स विकले गेले आहेत. ड्रायव्हरच्या सोयीसाठी तसेच केबिनमधील मनोरंजनासाठी वाहन यूएसबी मोबाइल चार्जिंग पोर्ट आणि ब्लौपंक्ट म्युझिक सिस्टमने सुसज्ज आहे.  फ्लीट एज या टाटा मोटर्सच्या नेक्स्ट-जेन कनेक्टेड व्हेइकल प्लॅटफॉर्मने युक्त आहे. टाटा 407 सीएनजी उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम 3 वर्षे /3 लाख किलोमीटर्सची वॉरंटी देऊ करते. डिझेल व्‍हेरिएण्‍टच्या तुलनेत 35 टक्क्यांपर्यंत अधिक नफा कमावता येऊ शकतो असा दावा कंपनीने केला आहे. 

Web Title: Tata 407 CNG variant light commercial vehicle launched at Rs 12.07 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा