जगात भारी; टाटाच्या कारला 'क्रॅश टेस्ट'मध्ये फाईव्ह स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 08:39 AM2020-01-16T08:39:38+5:302020-01-16T08:47:54+5:30

टाटा मोटार्स दिवसेंदिवस दर्जेदार गाड्या बाजारात आणत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

tata altroz awarded 5 star global ncap safety rating safest india made hatchback altroz | जगात भारी; टाटाच्या कारला 'क्रॅश टेस्ट'मध्ये फाईव्ह स्टार

जगात भारी; टाटाच्या कारला 'क्रॅश टेस्ट'मध्ये फाईव्ह स्टार

googlenewsNext
ठळक मुद्दे टाटा मोटर्स दिवसेंदिवस दर्जेदार गाड्या बाजारात आणत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटाची अल्ट्रॉज कारसुद्धा भारतीय बाजारात 22 जानेवारीला लाँच होणार आहे. टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz)ला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Global NCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळालं आहे.

नवी दिल्लीः टाटा मोटर्स दिवसेंदिवस दर्जेदार गाड्या बाजारात आणत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटाची अल्ट्रॉज कारसुद्धा भारतीय बाजारात 22 जानेवारीला लाँच होणार आहे. पण तत्पूर्वीच गाडीसंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz)ला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Global NCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळालं आहे. टाटा कंपनीसाठी हे मोठं यश आहे. 

खरं तर टाटा मोटर्सची अल्ट्रॉज ही दुसरी कार आहे, ज्या कारला ग्लोबल NCAPच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तत्पूर्वी नेक्सॉनला ग्लोबल NCAPच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग बहाल करण्यात आलं होतं. ग्लोबल NCAPनं टाटा अल्ट्रॉजला सुरक्षेसाठी 17 पैकी 16.13 अंक दिले आहेत. अल्ट्रॉजला प्रौढ प्रवासी संरक्षणामध्ये 17 पैकी 16.13 अंक मिळाल्यानं ती टाटा मोटर्ससाठी जमेची बाजू आहे. क्रॅश टेस्टदरम्यान टाटा अल्ट्रॉजनं चालक आणि पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाचं डोकं, मान आणि गुडघ्यांची चांगल्या पद्धतीनं सुरक्षा केली. त्यामुळेच क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळालं आहे. 

चाइल्ड प्रोटेक्शन क्रॅश टेस्टदरम्यान 1.5 वर्षांच्या डमी बाळाचीही सुरक्षा चांगली पद्धतीनं झाल्याचं समोर आलं आहे. परंतु क्रॅश टेस्टदरम्यान 3 वर्षांच्या मुलाच्या डमीची लावण्यात आलेली चाइल्ड सीट उघड झाली. त्यामुळे डमीचं डोकं कारच्या इंटिरियरला धडकलं. त्यामुळे काहीशी अंकात कपात आली. बाल संरक्षणात कारला 49पैकी 29 अंक देण्यात आले आहेत. त्यामुळे बाल संरक्षणात या कारला 3-स्टार रेटिंग बहाल करण्यात आलं आहे.  


टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz) खरेदी करायची असल्यास त्याची प्री-बुकिंग डिसेंबर 2019पासून सुरू झाली आहे. देशभरात टाटा मोटर्सच्या डीलरच्या माध्यमातून कारचं प्री-बुकिंग केलं जातं. या कारची डिलिव्हरी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. Altrozची किंमत 5 ते 8 लाख रुपयांदरम्यान असण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय बाजारात टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz)चा सामना ह्युंदाई एलिट आय 20, मारुती बलेनो, टोयोटा ग्लँजा आणि होंजा जॅज सारख्या कारबरोबर होणार आहे. अल्ट्रॉजमध्ये ड्युएअ फ्रंट एअरबॅग्स, ईबीडीबरोबरच एबीएस, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड अलार्म सिस्टीम आणि Isofix चाइल्ड सीट अँकरेजसारखे फीचर देण्यात आले आहेत. 

अल्ट्रॉजमध्ये बीएस 6 युक्त पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. कारच्या इंजिनमध्ये तीन पर्याय उपलब्ध असल्याचीही चर्चा आहे. एक टियागोमध्ये दिलेलं 85hp पॉवरचं 1.2-लीटरचं पेट्रोल इंजिन आणि दुसरं नेक्सॉनमध्ये दिलेलं 102hp पॉवरचं 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. तिसरं 90hp पॉवरचं 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन राहणार आहे. तिन्ही इंजिनबरोबर 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय काही काळानंतर देण्याची शक्यता आहे. फीचर्समध्ये फ्री स्टँडिंग 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्लेबरोबरच टाटा हॅरिअरसारखं डिजिटल इन्स्ट्रुमेंटही देण्यात आलं आहे.  
 

Web Title: tata altroz awarded 5 star global ncap safety rating safest india made hatchback altroz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा