Tata Altroz CNG Launch Date: मारुतीची खैर नाही! टाटा अल्ट्रॉझ सीएनजी लाँचिंगची तारीख जाहीर; दोन सिलिंडर, मोठी बुटस्पेस...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 07:55 PM2023-04-17T19:55:54+5:302023-04-17T19:58:05+5:30
दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटाने अल्ट्रॉझ आणि पंचचे सीएनजी व्हेरिअंट दाखविले होते. या कारचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ट्विन सिलिंडर होते.
फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगमध्ये मास्टरी मिळविलेल्या टाटा मोटर्सने आता परवडणाऱ्या सीएनजी कार मार्केटमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. टाटा मोटर्स सीएनजी मधील तिसरी कार येत्या दोन दिवसांत लाँच करणार आहे. अल्ट्रॉझ सीएनजी १९ एप्रिलला लाँच केली जाणार आहे.
टाटाच्या Tiago iCNG आणि टिगॉर सीएनजी अशा दोन कार आधीच उपलब्ध आहेत. यापैकी टाटा Tigor iCNG चा आम्ही रिव्हू केलेला आहे. तो वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे.
दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटाने अल्ट्रॉझ आणि पंचचे सीएनजी व्हेरिअंट दाखविले होते. या कारचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ट्विन सिलिंडर होते. यामुळे जी सामान ठेवण्याची जागा संपत होती ती आता मिळणार आहे. एका मोठाल्या सिलिंडरपेक्षा दोन सिलिंडर खालीच मॅनेज केल्याने नेहमीसारखीच बुट स्पेस मिळणार आहे. यामुळे ही सोय टाटाकडे ग्राहकांना आकर्षित करणार आहे.
टाटाने सोमवारी या लाँचची घोषणा केली आहे. या कारची किंमत अंदाजे दहा ते साडे दहा लाखांच्या आसपास असणार आहे. तसेच मायलेजही २२ ते २५ किमी प्रति किलोच्या आसपास असणार आहे. फाईव्ह स्टार सेफ्टी आणि कारचे वजन यामुळे थोडेफार मायलेज प्रभावित होण्याची शक्यता आहे.
टाटा अल्ट्रॉझ आम्हाला कशी वाटलेली... एकदा हा रिव्ह्यू पहाच...
Tata Altroz Review in Marathi: टाटा अल्ट्रॉझ: फाईव्हस्टार प्रिमियम, पण खिशाला परवडते का? 1160 किमीचा रिव्ह्यू, पहा कशी वाटली...