शेवटी टाटा ती टाटा! मारुतीला जे जमले नाही ते Tata Altroz ने करून दाखवले; 24 तासांत 1600 किमी पार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 07:39 PM2021-02-19T19:39:42+5:302021-02-19T19:40:13+5:30

Tata Altroz hits new records: इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्‍ये उल्‍लेखनीय प्रवेश. २४ तासांमध्‍ये प्रवासी कारने नोंदणी केलेल्‍या आतापर्यंतच्‍या अधिकतम अंतराचा विक्रम स्‍थापित केला

Tata Altroz Crossed 1600 km in 24 hours; Enters Into India Book of Records | शेवटी टाटा ती टाटा! मारुतीला जे जमले नाही ते Tata Altroz ने करून दाखवले; 24 तासांत 1600 किमी पार

शेवटी टाटा ती टाटा! मारुतीला जे जमले नाही ते Tata Altroz ने करून दाखवले; 24 तासांत 1600 किमी पार

Next

मुंबई : टाटा मोटर्स या भारतीय ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने आज घोषणा केली की, त्‍यांच्‍या प्रिमिअम हॅचबॅक अल्‍ट्रोजने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्‍ये उल्‍लेखनीय नोंद केली आहे. हे यश मिळवण्‍यासाठी अल्‍ट्रोजने २४ तासांमध्‍ये १,६०३ किमीचे अधिकतम अंतर कापले असून नवीन भारतीय विक्रम प्रस्‍थापित केला. हा अपवादात्‍मक प्रवास पुण्‍यातील ऑटो उत्‍साही देवजीत सहा यांनी पार केला आहे. त्‍यांनी १५ डिसेंबर व १६ डिसेंबर २०२० दरम्‍यान २४ तासांमध्‍ये सातारा ते बेंगळुरू अंतर कापले आणि पुन्‍हा पुण्‍यामध्‍ये परतले. या यशामध्ये अल्‍ट्रोज लांबच्‍या प्रवासादरम्‍यान देत असलेल्‍या दर्जात्‍मक आरामदायी सुविधेसह रोमहर्षक कामगिरी दिसून येते. (Tata Altroz Enters Into India Book of Records – 1,603kms in 24 hours)


देवजीत सहा म्‍हणाले, ''मला हा लक्षणीय प्रवास सुरू करण्‍याची संधी दिल्‍याबद्दल आनंद होत आहे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसध्‍ये समाविष्‍ट झाल्‍याबाबत सन्‍माननीय वाटत आहे. हे यश टाटा अल्‍ट्रोजची विश्‍वसनीयता आणि टाटा मोटर्स येथील अत्‍यंत सहाय्यक टीमशिवाय शक्‍य झाले नसते. अल्‍ट्रोजने या लांबच्‍या प्रवासादरम्‍यान दर्जात्‍मक उत्‍पादन असल्‍याचे दाखवून दिले. कारची राइड व हाताळणीमुळे प्रवास अत्‍यंत आरामदायी होण्‍यासोबत रोमहर्षक झाला.'' 

या यशाबाबत बोलताना टाटा मोटर्सच्‍या पॅसेंजर वेईकल्‍स बिझनेस युनिटचे विपणन प्रमुख विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ''अल्‍ट्रोजने आकर्षक डिझाइन, उच्‍चस्‍तरीय सुरक्षितता व रोमांचक कामगिरीच्‍या माध्‍यमातून तिच्‍या विभागामध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स निर्माण केले आहेत. आम्‍हाला आनंद होत आहे की, सहा यांनी हा दुर्मिळ टप्पा संपादित करण्‍यासाठी लांबच्‍या प्रवासादरम्‍यान त्‍यांची सोबती म्‍हणून अल्‍ट्रोजची निवड केली. या यशासह अल्‍ट्रोजने पॅसेंजर वेईकल्‍स विभागामध्‍ये आणखी एक बेंचमार्क निर्माण केला आहे.''


तुफान Video व्हायरल! 'क्रॅश डेटला येताय का?'; टाटा मोटर्सने उडविली मारुती, ह्युंदाईची खिल्ली

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् हे २००६ पासून निर्माण करण्‍यात आलेल्‍या इंडियन रेकॉर्डसचे कस्‍टडियन आहे. बुकची १५वी आवृत्ती (२०२० साठी) २०१९ मध्‍ये सादर करण्‍यात आली. हे एकमेव बुक ऑफ रेकॉर्डस् आहे, ज्‍याचे व्हिएतनाम, मलेशिया, यूएसए, नेपाळ, इंडोनेशिया, बांग्‍लादेश व थायलंड या सात देशांमधील प्रमुख संपादक बोर्ड सदस्‍य म्‍हणून आहेत.

एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे

 

अल्‍ट्रोजला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आणि जानेवारी २०२० मध्‍ये अल्‍ट्रोज आय-टर्बोच्‍या सादरीकरणासह हा क्षण साजरा करण्‍यात आला. अल्‍ट्रोजमध्‍ये नवीन तंत्रज्ञान व १.२ लिटर टर्बोचार्ज बीएस-६ पेट्रोल इंजिन आहे. अल्‍ट्रोज आय-टर्बो नवीन हार्बर ब्‍ल्‍यू रंगामध्‍ये सादर करण्‍यात आली आहे. ५५०० आरपीएममध्‍ये ११० पीएस शक्‍तीसह अल्‍ट्रोज आय-टर्बो १५००-५५००आरपीएममध्‍ये १४० एनएम टॉर्क देते, ज्‍यामधून आनंददायी ड्राइव्‍हची खात्री मिळते. यामध्‍ये भर म्‍हणून स्‍पोर्ट/ सिटी मल्‍टी ड्राइव्‍ह मोड्स अल्‍ट्रोजला साहसी व शहरातील ड्रायव्हिंगचे परिपूर्ण संयोजन देते. २०२१ अवतारामधील अल्‍ट्रोजमध्‍ये नवीन ब्‍लॅक व लाइट ग्रे इंटीरिअर्ससह लेदर सीट्स असतील, ज्‍यामधून कारच्‍या प्रिमिअम दर्जामध्‍ये वाढ होईल.

Web Title: Tata Altroz Crossed 1600 km in 24 hours; Enters Into India Book of Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा