Tata Altroz iCNG: टाटाने भारदस्त युक्ती वापरली! अल्ट्रॉझमध्ये सीएनजीचे दोन दोन सिलिंडर, पण 'गायब'; मोठी बूट स्पेस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:53 PM2023-01-13T14:53:22+5:302023-01-13T15:29:01+5:30
टाटाने सीएनजीमुळे होणारी ग्राहकांची बुटस्पेसची अडचणच संपवून टाकली आहे.
टाटाने यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये धमाल केली आहे. एकसोएक इलेक्ट्रीक कार दाखविल्या आहेत. असे असताना टाटाने पंच आणि अल्ट्रूझची सीएनजी व्हेरिअंटदेखील प्रदर्शीत केली आहे. टाटाने बुट स्पेस तशीच ठेवण्यासाठी एक जबरदस्त क्लुप्ती वापरली आहे. देशात अशी टेक्नॉलॉजी देणारी टाटा ही पहिली कंपनी ठरली आहे.
टाटाने सीएनजीमुळे होणारी ग्राहकांची बुटस्पेसची अडचणच संपवून टाकली आहे. टाटाने कार छोटी असली तरी एकच सिलिंडर न देता दोन सिलिंडर दिले आहेत. यामुळे भलेभले थक्क झाले आहेत. हे सिलिंडर स्पेअर टायर असतो त्या ठिकाणी देण्यात आले आहेत. यामुळे वरती मॅट असल्याने त्याच्यावरची जागा सामानासाठी वापरता येणार आहे.
टाटा मोटर्स याला "ट्विन सिलेंडर सीएनजी टेक्नॉलॉजी" म्हणत आहे. Altroz CNG मधील CNG टाक्या इतक्या चांगल्या प्रकारे लपलेल्या आहेत की बुट स्पेसमध्ये त्या दिसतच नाहीत. Tata Altroz iCNG ने Tata Punch iCNG दोन्ही कार येत्या काळात लाँच होतील.
INDIA's first Twin Cylinder CNG Technology
— tuba tanveer (@tuba_tanveer) January 11, 2023
Thank @TataMotors_Cars for this beauty@TataMotors_Cars#TataMotorsAtAE23pic.twitter.com/ToFm2iDSwK
अल्ट्रॉझचे इंजिन CNG वर चालत असताना 73bhp आणि 95Nm टॉर्क उत्पन्न करेल. गिअरबॉक्स 5-स्पीड मॅन्युअल असेल. प्रदर्शीत केलेल्या अल्ट्रॉझला सनरुफ देण्यात आला आहे.