Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:55 PM2024-05-27T17:55:36+5:302024-05-27T17:56:31+5:30

Tata Altroz Racer : अल्ट्रोझ रेसरला ड्युअल टोन कलर स्कीम, रेसिंग स्ट्रिप्ससह टॉप आणि बोनेट, अल्ट्रोझ रेसर बॅज मिळेल.

Tata Altroz Racer official teaser released ahead of launch | Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?

Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?

नवी दिल्ली : टाटा मोटर्स पुढील महिन्यात जूनमध्ये अल्ट्रोझ रेसर (Altroz ​​Racer) लाँच करणार आहे. कंपनीने या कारचा पहिला टीझर रिलीज केला आहे. त्यानुसार, ही कार सध्याच्या Altroz ​​ची स्पोर्टी व्हर्जन असणार आहे. अल्ट्रोझ रेसरला ड्युअल टोन कलर स्कीम, रेसिंग स्ट्रिप्ससह टॉप आणि बोनेट, अल्ट्रोझ रेसर बॅज मिळेल. या कारला मागील बाजूस नवीन स्पॉयलर मिळेल. 

कारच्या इंटिरिअरमध्ये सर्व ब्लॅक इंटीरियर थीम आणि रेड टच दिला जाईल. टाटा अल्ट्रोझ रेसर व्हर्जनची लांबी 3990mm, रुंदी 1755mm, उंची 1523mm आणि व्हीलबेस 2501mm असेल. यात 16 इंची व्हील्स देण्यात येणार आहेत. लाँच झाल्यानंतर या कारची स्पर्धा Hyundai i20 N Line आणि Maruti Suzuki Suzuki Fronx Turbo सारख्या कारसोबत होईल.

Tata Altroz Racer इंजिन
नवीन अल्ट्रोझ ​मध्ये 1.2 लीटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे 120bhp पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करेल. मात्र, या मॉडेलमध्ये फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स पर्याय असणार आहे. त्याची अल्ट्रोझ ​​रेसर जवळपास Hyundai i20 N Line सारखीच शक्तिशाली असेल. Hyundai i20 N Line मध्ये 1.0 लीटर, 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 120bhp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. तर Maruti Suzuki Frontis Turbo मध्ये 1.0 लिटर, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे 100bhp पॉवर आणि 148Nm टॉर्क जनरेट करते.

Tata Altroz Racer ची किंमत
सध्या अल्ट्रोज रेसरची किंमत अजून जाहीर केलेली नाही. कारची किंमत 10 लाखांच्या आसपास ठेवली जाण्याची शक्यता आहे. तर Hyundai i20 N Line ची किंमत 9.99 लाख ते 11.49 लाख रुपये आहे. तसेच, Maruti Frontex Turbo ची किंमत 9.72 लाख ते 13.04 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.

Tata Altroz बद्दल जाणून घ्या...   
टाटा अल्ट्रोझच्या नॉर्मल मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर यात 3 इंजिनांचा पर्याय आहे. एक म्हणजे 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, जे 88PS/ 115Nm आउटपुट देते. दुसरे 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 110PS/ 140Nm आउटपुट देते. तिसरे 1.5 लिटर डिझेल इंजिन आहे, जे 90PS/ 200Nm आउटपुट देते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) चा पर्याय उपलब्ध आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 6.65 लाख ते 10.80 लाख रुपये आहे.

Web Title: Tata Altroz Racer official teaser released ahead of launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.