Tata Altroz: टाटाने अल्ट्रॉझचे चार व्हेरिअंट बंद केले; कारण काय? फाईव्ह स्टार तरीही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 09:46 AM2022-08-23T09:46:35+5:302022-08-23T09:46:48+5:30
ata Altroz च्या विक्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये घट झाली आहे. ग्राहक टाटाच्या नव्या पर्यायाकडे वळू लागले आहेत.
दुसऱ्या नंबरसाठी ह्युंदाईसोबत स्पर्धेत असलेली स्वदेशी कंपनी टाटा मोटर्सने फाईव्ह स्टार रेटिंगची कार अल्ट्रॉझचे चार व्हेरिअंट बंद केले आहेत. या व्हेरिअंटला मागणी कमी झाली की अन्य काही कारण हे अद्याप समजलेले नाही.
टाटा अल्ट्रॉझ ही टाटाची फाईव्ह स्टार ग्लोबल सेफ्टी रेटिंग असलेली कार आहे. टाटाने Tata Altroz XE, XZ Dark आणि XZ(O) डिझेल व्हेरिअंट बंद केले आहेत. याचबरोबर XZA(O) पेट्रोल हा व्हेरिअंटदेखील बंद केला आहे. मात्र, हे बदल करताना आणखी एक बदल म्हणजे टाटा मोटर्सने अल्ट्रोझच्या लाइनअपमध्ये XT डार्क एडिशन जोडले आहे.
वेरिएंटमधील बदलांसह, टाटा मोटर्सने अल्ट्रोझसाठी हाय स्ट्रीट गोल्ड कलर स्कीम पुन्हा आणली आहे. यामुळे ही हॅचबॅक आता एकूण सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हाय स्ट्रीट गोल्ड, ऑपेरा ब्लू, आर्केड ग्रे, डाउनटाउन रेड, अव्हेन्यू व्हाइट, कॉस्मो ब्लॅक आणि हार्बर ब्लू असे हे रंग आहेत.
Tata Altroz च्या विक्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये घट झाली आहे. ग्राहक टाटाच्या नव्या पर्यायाकडे वळू लागले आहेत. टाटाच्या पंचने दहा महिन्यांत लाखाचा टप्पा गाठला आहे. याचा परिणाम टाटाच्या अन्य कारच्या विक्रीवर झाल्याचे बोलले जात आहे. काही डीलर्सनुसार काही व्हेरिअंट बंद करण्याचे कारण म्हणजे लाइनअप रीफ्रेश करण्यासाठी घेतलेला निर्णय आहे.
Tata Altroz मध्ये यांत्रिक बदल करण्यात आलेला नाही. Tata Altroz ला तीन इंजिन पर्याय आहेत, एक 85 bhp 1.2-लीटर पेट्रोल इंजिन, 108 bhp 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 89 bhp 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे.