टाटाने आपल्या 'या' स्वस्त कारचे नवे व्हेरिअंट केले लॉन्च, देण्यात आले आहेत 5 नवे खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:36 PM2022-07-31T17:36:38+5:302022-07-31T17:37:45+5:30

टाटा टिआगो आणि टिआगो NRG मध्ये Revotron 1.2 लिटरचे 3-सिलिंडर, पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 85 bhp एवढी पॉवर जनरेट करते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गियरबॉक्सला जोडण्यात आले आहे.

TATA car tata tiago xt variant gets new features tiago nrg xt launched | टाटाने आपल्या 'या' स्वस्त कारचे नवे व्हेरिअंट केले लॉन्च, देण्यात आले आहेत 5 नवे खास फीचर्स

टाटाने आपल्या 'या' स्वस्त कारचे नवे व्हेरिअंट केले लॉन्च, देण्यात आले आहेत 5 नवे खास फीचर्स

googlenewsNext


टाटाने (Tata) अपल्या हॅचबॅक टिआगोमध्ये (Tata Tiago) आता नव्या XT व्हेरिअंटचा समावेश केला आहे. हे व्हेरिअंट 5 नव्या फीचर्ससह येते. कंपनीने टिआगो NRG मध्येही XT व्हेरिअंटचा समावेश केला आहे. या नव्या व्हेरिअंटमध्ये 14-इंचाचे हायपरस्टाईल व्हील, हाइट एडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर पार्सल सेल्फ, को-ड्रायव्हर साईड व्हॅनिटी मिरर बी-पिलर टेप, हरमन ब्रँडचे 7-इंचाचे टचस्क्रीन म्युझिक सिस्टिम, रिअर कॅमेरा आणि 4 ट्विटर स्पीकर देण्यात आले आहेत. टाटा टिआगोची एक्स-शोरूम किंमत 5.39 लाख रुपयांपासून सुरू होते. 

1.2 लिटर पेट्रोल इंजिन -
टाटा टिआगो आणि टिआगो NRG मध्ये Revotron 1.2 लिटरचे 3-सिलिंडर, पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 85 bhp एवढी पॉवर जनरेट करते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गियरबॉक्सला जोडण्यात आले आहे. हे इंजिन अत्यंत पॉवरफुल आहे. या कारमध्ये सेफ्टीसाठी डुअल-फ्रंट एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेंसर कॅमेरा आणि फॉलो-मी लॅम्प सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत

टाटा टिआगो XT चे नवे फीचर्स -
टाटा टिआगो XT च्या नव्या व्हेरिअंटमध्ये 14-इंचाचे हायपरस्टाइल व्हील, हाइट एडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर पार्सल सेल्फ, को-ड्रायव्हर साइड वॅनिटी मिरर बी-पिलर टेप, हरमन ब्रांडचे 7-इंचाचे टचस्क्रीन म्युझिक सिस्टिम, रिअर कॅमेरा आणि 4 ट्विटर स्पीकर देण्यात आले आहेत. हे फीचर्स ग्राहकांची मागणी लक्षात घेत अॅड करण्यात आले आहेत. कंपनीने XT व्हेरिअंट आपल्या टिआगो NRG मध्येही सामील केले आहेत. 

पूर्वी टिआगो NRG केवळ टॉप-स्पेक XZ+ ट्रिमवर बेस्ड होती. आता ग्राहकांची गरज लक्षात घेत कंपनीने, टियागोच्या नव्या XT ट्रिम प्रमाणे, NRG चे कमी किंमतीचे व्हेरिअंट सादर केले आहे. टिआगो XT च्या तुलनेत, NRG XT मध्ये 10mm अधिक ग्राउंड क्लिअरन्स, बॉडी क्लॅडिंग, रूफ रेल्ससह ब्लॅक-आउट रूफ, चारकोल ब्लॅक इंटीरियर्स, फ्रंट फॉग लॅप्स, रिअर डिफॉगर, रिअर वॉशर आणि वायपरचा  समावेश आहे.
 

Web Title: TATA car tata tiago xt variant gets new features tiago nrg xt launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.