ग्राहकांना मिळू लागली Tata ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, फूल चार्जमध्ये 315KM रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:15 PM2023-02-04T12:15:48+5:302023-02-04T12:16:17+5:30

Tata Motors : भारतात इलेक्ट्रिक कार विकण्यात टाटा मोटर्स आघाडीवर आहे.

tata cheapest electric car tiago ev deliveries commence | ग्राहकांना मिळू लागली Tata ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, फूल चार्जमध्ये 315KM रेंज

ग्राहकांना मिळू लागली Tata ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, फूल चार्जमध्ये 315KM रेंज

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या वर्षीपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने ऑटो मार्केटमध्ये लाँच करत आहे. भारतात इलेक्ट्रिक कार विकण्यात टाटा मोटर्स आघाडीवर आहे. कंपनीच्या टाटा नेक्सॉन ईव्हीची (Tata Nexon EV) सर्वाधिक विक्री होत आहे. 

टाटा मोटर्सने (Tata Motors) ऑक्टोबर 2022 मध्ये आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) लाँच केली होती. त्याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये ठेवण्यात आली होती. या किमतीचा लाभ पहिल्या 20 हजार ग्राहकांनाच मिळणार होता. पहिल्याच दिवशी कारचे 10,000 बुकिंग झाले आणि आतापर्यंत हा आकडा 20,000 च्या पुढे गेला आहे.

अलीकडेच, टाटा मोटर्सने या ईव्हीची डिलिव्हरी सुरू केली आहे. टाटा मोटर्सने घोषित केले आहे की, कंपनीने इलेक्ट्रिक कार टियागो ईव्हीची पूर्णपणे डिलिव्हरी सुरू केली आहे. तसेच, पहिल्याच दिवशी भारतातील 133 शहरांमधील ग्राहकांना इलेक्ट्रिक हॅचबॅकचे पहिले 2,000 युनिट्स डिलिव्हरी केले आहेत, असे खुलासा कंपनीने केला आहे.   

बॅटरी पॅक आणि रेंज
टाटा टियागो ईव्ही  XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux या चार ट्रिममध्ये येते. कारला बॅटरी पॅक आणि चार्जिंग ऑप्शनच्या आधारावर विभागले गेले आहेत. यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन 19.2kWh आणि 24kWh आहेत. 19.2 kWh ची बॅटरी फूल चार्ज केल्यावर 250 किमी पर्यंतची रेंज देते, तर मोठा बॅटरी पॅक फूल चार्ज केल्यावर 315 किमी पर्यंत रेंज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

चार्जिंग वेळ
कारमध्ये चार्जिंगसाठी एकूण 4 ऑप्शन देण्यात आले आहेत. ही 7.2kW चार्जरसह 3.6 तासात 10-100 टक्के चार्ज केली जाऊ शकते. 15A पोर्टेबल चार्जरसह 8.7 तासांत ती 10 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. याचप्रमाणे, DC फास्ट चार्जरद्वारे कार केवळ 58 मिनिटांत 10 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते.

Web Title: tata cheapest electric car tiago ev deliveries commence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.