Tata ने सुरू केली 'या' शानदार  SUV ची टेस्टिंग, Hyundai Creta देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 02:39 PM2023-07-12T14:39:15+5:302023-07-12T14:39:45+5:30

या एसयूव्हीची लांबी 4.3 मीटर असणार आहे.

tata curve suv coupe testing begins | Tata ने सुरू केली 'या' शानदार  SUV ची टेस्टिंग, Hyundai Creta देणार टक्कर!

Tata ने सुरू केली 'या' शानदार  SUV ची टेस्टिंग, Hyundai Creta देणार टक्कर!

googlenewsNext

या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत टाटा मोटर्स नेक्सॉन, हॅरियर आणि सफारीचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 2023 ऑटो एक्सपोमध्ये कर्व्ह एसयूव्ही कूपे कॉन्सेप्ट सादर केली होती. जी 2024 च्या पहिल्या सहामाहीत लाँच होण्याची शक्यता आहे. यासाठी टाटा मोटर्सने भारतीय रस्त्यांवर कर्व्ह एसयूव्ही (Tata Curve SUV) कूपेची टेस्टिंग सुरू केली आहे.

या एसयूव्हीची लांबी 4.3 मीटर असणार आहे. तसेच ही एसयूव्ही Hyundai Creta, Kia Seltos, MG Aster, Skoda Kushaq, VW Taigun, Maruti Grand Vitara, Toyota Hyrider आणि लवकरच लाँच होणार्‍या Honda Elevate ला टक्कर देऊ शकते. टाटाची ही एसयूव्ही GEN-2 प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे.

नवीन टाटा कर्व्ह एसयूव्ही कूपे ब्रँडची नवीन डिझाइन भाषेला प्रतिबिंबित करेल, ज्यामध्ये नवीन फ्रंट आणि रिअर डिझाइनचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन एसयूव्ही तरुण खरेदीदारांसाठी असणार आहे, ज्यांना वेगळे आणि आकांक्षी प्रोडक्ट घरी घेऊन जायचे आहे. हे नेक्सॉनच्या तुलनेत लांब व्हीलबेससह येईल. यात मोठ्या ओव्हरहॅंग एरियासह संपूर्ण नवीन मागील प्रोफाइल मिळू शकते.

कर्व्हच्या कॉन्सेप्ट व्हर्जनमध्ये 20-इंच व्हील दिसून आली आहेत. परंतु प्रोडक्शन मॉडेलमध्ये 17-इंच आणि 16-इंच व्हील मिळण्याची शक्यता आहे. टेस्टिंगदरम्यान पाहिलेले मॉडेल कव्हर केले होते. मात्र, आम्ही आशा आहे की, या एसयूव्हीच्या डिझाइन एलिमेंट्समध्ये फारसा बदल (कॉन्सेप्ट व्हर्जनच्या तुलनेत) होणार नाही.

कर्व्हचे व्हर्जन    आयसीई आणि इलेक्ट्रिक या दोन पॉवरट्रेन पर्यायांसह उपलब्ध असणार आहे. मात्र, आधी पेट्रोल व्हर्जन लाँच केले जाईल. यामध्ये सीएनजीचा पर्यायही दिला जाऊ शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, एसयूव्हीमध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ऑटो पार्क असिस्ट आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स असतील.

Web Title: tata curve suv coupe testing begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.