Tata च्या 'या' दोन एसयूव्ही महागल्या, 26 व्हेरिएंट देखील केले बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 09:19 PM2023-02-28T21:19:08+5:302023-02-28T21:20:11+5:30

Tata Harrier & Tata Safari : टाटा मोटर्सने या महिन्यात केलेली ही दुसरी दरवाढ आहे. पहिली दरवाढ महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती, तेव्हा किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

tata harrier and safari price hike up to rs 66000, 26 variants discontinued | Tata च्या 'या' दोन एसयूव्ही महागल्या, 26 व्हेरिएंट देखील केले बंद 

Tata च्या 'या' दोन एसयूव्ही महागल्या, 26 व्हेरिएंट देखील केले बंद 

googlenewsNext

सफारी आणि हॅरियरच्या रेड डार्क एडिशन लाँच केल्यानंतर काही दिवसांनी टाटा मोटर्सने या दोन्ही मॉडेल्सचे काही व्हेरिएंट बंद केले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने या महिन्यात केलेली ही दुसरी दरवाढ आहे. पहिली दरवाढ महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती, तेव्हा किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

हॅरियर आणि सफारीची किंमत का वाढवली?
यावेळी टाटा मोटर्सने हॅरियरची किंमत 47,000 रुपयांनी आणि सफारीने 66,000 रुपयांनी वाढवली आहे. निवडक व्हेरिएंटमध्ये ADAS, मोठी टचस्क्रीन, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी नवीन फीचर्सचा समावेश केल्यामुळे किंमत वाढ झाली आहे. याशिवाय, टाटाच्या इतर गाड्यांच्या किमतीत वाढ करण्यात आलेली नाही. टाटा नेक्सॉन, पंच, टियागो, टिगोर आदींच्या किंमती पूर्वीप्रमाणेच आहेत.

हॅरियर आणि सफारीचे 26  व्हेरिएंट बंद 
आतापर्यंत हॅरियरचे 30 व्हेरिएंट येत होते आणि सफारीचे 36 व्हेरिएंट येत होते. हॅरियर आणि सफारीचे एकूण 66 व्हेरिएंट ऑफरवर होते. आता यातील 26  व्हेरिएंट बंद करण्यात आले आहेत. हॅरियर लाइनअपमध्ये रेड डार्क एडिशनचे 2 नवीन व्हेरिएंट जोडण्यात आले आहेत. यासह, आता हॅरियरच्या एकूण व्हेरिएंटची संख्या 20 झाली आहे. याचबरोबर, सफारीला 4 नवीन रेड डार्क व्हेरिएंट मिळाले आहेत, ज्यामुळे सफारीच्या व्हेरिएंटची संख्या 26 झाली आहे.
 

Web Title: tata harrier and safari price hike up to rs 66000, 26 variants discontinued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.