टाटाच्या 'या' दोन 5-स्टार सेफ्टी असलेल्या SUVs ची मक्तेदारी संपली; विक्री धडाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 06:36 PM2023-06-19T18:36:36+5:302023-06-19T18:40:20+5:30
...यामुळेच, कधी काळी मिड साईज एसयूव्ही सेगमेंटवर दबदबा असलेल्या या दोन एसयूव्हीची मक्तेदारी संपली आहे.
टाटा मोटर्सच्या कार प्रामुख्याने सेफ्टी आणि जबरदस्त बिल्ड क्वालिटीसाठी ओळखल्या जातात. मात्र असे असतानाही लोकांकडून टाटाच्या 5-स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या टाटा हॅरिअर आणि सफारीला कमी पसंती मिळत आहे. यामुळेच, कधी काळी मिड साईज एसयूव्ही सेगमेंटवर दबदबा असलेल्या या दोन एसयूव्हीची मक्तेदारी संपली आहे.
कारण, वार्षिक आणि मासिक आधारावर टाटाच्या या दोन एसयूव्हीच्या विक्रीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मिड साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये सध्या महिंद्राची स्कॉर्पिओ/N आणि XUV700 चा अधिक बोलबाला दिसत आहे. जर एक नजर टाकूयात टाटाच्या या दोन एसयूव्हीच्या मे 2023 मधील विक्रीच्या रिपोर्टवर...
टाटा हॅरिअरची विक्री धडाम -
मे 2023 मध्ये टाटा हॅरिअरच्या (Tata Harrier) बिक्रीत जबरदस्त घसरण दिसून आली आहे. टटा हॅरिअरची विक्री 17.57 टक्यांनी वार्षिक आधारावर, तर 17.25 टक्क्यांनी मासिक आधारावर घसरून 2,303 युनिट झाली आहे. मे 2022 आणि एप्रिल 2023 मध्ये अनुक्रमे हॅरिअर 2,794 युनिट्स आणि 2,783 युनिट्सची विक्री केली होती.
टाटा सफारीच्या विक्रीतही घसरण -
दूसरी ओर सफारी की बिक्री 20.79 प्रतिशत YoY और 12.47 प्रतिशत MoM घटकर 1,776 यूनिट्स हो गई। इसके विपरीत मई 2022 और अप्रैल 2023 में सफारी ने क्रमश: 2,242 यूनिट्स और 2,029 यूनिट्स की बिक्री की थी।
...म्हणून विक्रीत अचानक घसरण?
टाटा मोटर्सने (Tata Motors) हॅरिअर (Harrier) आणि सफारी (Safari) या दोन्ही गाड्यांच्या विक्रीत घसरण नोंदवली आहे. कदाचीत, खरेदिदार हॅरियर आणि सफारी फेसलिफ्टची वाट पाहत असावेत यामुळे असे झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण याच वर्षाच्या अखेरपर्यंत या दोन्ही ढासू एसयूव्हींचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च होत आहेत. या दोन्ही कार नुकत्याच हिमाचल आणि लद्दाखच्या उंच पहाडींवर टेस्टिंगदरम्यान दिसून आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अपकमिंग फेसलिफ्ट मॉडल्समध्ये अनेक कॉस्मेटिक, फीचर आणि सेफ्टी अपडेट बघायला मिळू शकतात.