टाटा मोटर्स आणणार नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही; जाणून घ्या Curvv, Harrier आणि Sierra EV ची लाँच टाइमलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 02:52 PM2024-06-12T14:52:40+5:302024-06-12T14:53:21+5:30
कंपनी आपली ईव्ही लीडरशिप टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.
नवी दिल्ली : सध्या देशातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. भारतात टाटा मोटर्स ही सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी आहे. दरम्यान, कंपनी आपली ईव्ही लीडरशिप टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. पुढील दोन वर्षांत अनेक नवीन वाहने लाँच करण्याची योजना आखत आहे. यानुसार, सर्वात आधी कर्व्ह ईव्ही येणार आहे, जी इतरांप्रमाणेच अॅक्टी. ईवी आर्किटेक्चरवर आधारित असणार आहे. याचा अर्थ यात समोर आणि मॉड्यूलर इंटीरियरसह अधिक फीचर्स असतील.
टाटा कर्व्ह सर्वात आधी येईल
या सणासुदीच्या हंगामात पहिल्यांदा टाटाचे कर्व्ह ईव्ही व्हर्जन लाँच होणार आहे. टाटा कर्व्ह एक टिप ऑफ आइसबर्ग असेल, कारण टाटा मोटर्सने या सेगमेंटमध्ये एक नव्हे तर आणखी तीन ईव्ही आणण्याची योजना आखली आहे.
टाटा हॅरियर ईव्ही पुढील वर्षी लाँच होणार
टाटा कंपनी पुढील वर्षी हॅरियर ईव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारत मोबिलिटी शोमध्ये कार जवळजवळ प्रोडक्शन रेडी व्हर्जनमध्ये दिसून आली आहे. ही कार Acti.EV प्लॅटफॉर्मवर देखील आधारित असणार आहे. तसेच, कर्व्हपेक्षा मोठी असल्यामुळे कारची रेंज जास्त असणे अपेक्षित आहे. या कारला ६० kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे, जी सुमारे ५०० किमीची रेंज देऊ शकते. हॅरियर ईव्हीमध्ये V२V आणि V२L फीचर्ससह फ्रंक असणे अपेक्षित आहे. तसेच, यात ड्युअल मोटर लेआउट असेल आणि सर्व व्हील ड्राइव्ह सिस्टमने असेल. डिझाइनच्या बाबतीत, हॅरियर ईव्हीला स्पेसिफिक खास डिझाइन टच देखील मिळेल.
टाटा सिएरा शेवटी येईल
हॅरियर ईव्ही लाँच झाल्यानंतर Sierra.ev बाजारात आणण्याची शक्यता आहे. सिएरा ईव्ही ही फ्लॅगशिप एसयूव्ही असेल. ही कार ५ डोअर कार असेल पण फ्युचरिस्टिक डिटेलिंगसोबतच टच सारख्या काही कॉन्सेप्टही यात पाहायला मिळतील. लाउंज सारखे वातावरण कायम ठेवताना ब्लॅक आऊट पिलर देखील एक शानदार टच आहेत. टाटा मोटर्स ड्युअल मोटर्स आणि अनेक फीचर्ससह ही ईव्ही आणणार आहे.