टाटाने शेवटी गेम केलाच! ह्युंदाईच्या एक्स्टर पेक्षाही दीड लाखाने स्वस्त पंच सीएनजी लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 04:55 PM2023-08-04T16:55:08+5:302023-08-04T16:55:39+5:30
टाटाने आज फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंग असलेली पंचची सीएनजी कार लाँच केली आहे. काही दिवसांपूर्वी ह्युंदाईने एक्स्टर ही सीएनजीमध्येही लाँच केली होती.
छोट्या कारकडून आता सीएनजी मोठ्यातल्या छोट्या कारकडे वळू लागला आहे. ही स्पर्धा आता एवढी तीव्र होणार आहे, कारण टाटाही सीएनजीच्या कारमध्ये उतरली आहे. आधी मारुती आणि ह्युंदाईकडेच सीएनजी कार होत्या. परंतू आता टाटाही टियागो, टिगॉर, अल्ट्रूझसह आता पंचलाही सीएनजीमध्ये आणले आहे. ह्युंदाईला आज टाटाने जबरदस्त पंच दिला आहे.
टाटाने आज फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंग असलेली पंचची सीएनजी कार लाँच केली आहे. काही दिवसांपूर्वी ह्युंदाईने एक्स्टर ही सीएनजीमध्येही लाँच केली होती. ती टाटा पंचला टक्कर देणार असले सांगितले जात होते. परंतू, टाटाने इथेच सर्व गेम फिरविला आहे. पंच सीएनजीचे पाच व्हेरिअंट लाँच करत किंमतही एक्स्टरपेक्षा कमी ठेवली आहे.
टाटा पंच सीएनजीची किंमत 7.10 लाख रुपये ते 9.68 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी ठेवण्यात आली आहे. Exter CNG ची सुरुवातीची किंमत 8.24 लाख रुपयापासून सुरु होते. पंच सीएनजी तीन ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये प्युअर, अॅडव्हेंचर आणि एक्म्प्लिश्ड आहेत. सीएनजी वेरिएंट प्रत्येक पेट्रोल ट्रिमच्या तुलनेत 1.60 लाख रुपयांनी महाग आहे.
परंतू, तुम्ही जर बुटस्पेसचा विचार केलात तर तुम्हाला आधीसारखीच मोठी बुटस्पेस मिळणार आहे. कारण टाटाने ट्विन सिलिंडर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. पंचच्या सुरुवातीच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत सहा लाख रुपयांपासून सुरु होते.
पंच CNG मध्ये, कंपनीने तेच 1.2-लिटर, तीन-सिलेंडर इंजिन वापरले आहे जे पेट्रोल प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन पेट्रोलवर 86hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते आणि CNG मोडमध्ये 73.4hp पॉवर आणि 103Nm पीक टॉर्क जनरेट करते. टाटा मोटर्सच्या CNG लाईन-अपमधील इतर मॉडेल्सप्रमाणे, PUNCH देखील CNG मोडमध्ये थेट सुरू केले जाऊ शकते.