टाटा टेन्शनमध्ये! एमजीची धूमकेतू येतेय; उद्या सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार लाँच करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 02:05 PM2023-04-18T14:05:49+5:302023-04-18T14:06:06+5:30
आता ही कार दोन सीटर असेल की चार, पाच सीटर हे उद्याच आपल्याला समजणार आहे.
उद्या, १९ एप्रिलला भारतीय बाजारात एमजी दुसरी इलेक्ट्रीक कार उतरविणार आहे. टाटाचा या इलेक्ट्रीक कार क्षेत्रात दबदबा आहे. असे असताना एमजी अल्टोपेक्षाही छोटी असलेली Comet EV लाँच करणार आहे. या कारची किंमतही स्वस्त असणार असल्याचे सांगितले जात आहे.
एमजी ही कार 20 kWh आणि 25 kWh या दोन बॅटरी पॅक पर्यायांसह लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. कॉमेट म्हणजे धुमकेतू असा या नावाचा अर्थ आहे. पूर्ण चार्ज केल्यावर या बॅटरी पॅकची रेंज सुमारे 150 किमी आणि 200 किमी असणे अपेक्षित आहे. भारतात ही कार सिट्रॉएन सी३ आणि टाटा टियागोशी स्पर्धा करेल.
आता ही कार दोन सीटर असेल की चार, पाच सीटर हे उद्याच आपल्याला समजणार आहे. कंपनीने आज पुन्हा एमजी कॉमेटचा टीझर दाखवला आहे. कारच्या आतील बाजूस फ्लोटिंग ट्विन डिस्प्ले देण्यात आला आहे. AC व्हेंट हाउजिंग, साइड पॅनेल्स आणि दोन मोठ्या स्क्रीन डॅशबोर्डवर MG चे ब्रँडिंग करण्यात आले आहे.
कारचे आतील भाग जवळजवळ वुलिंग एअर ईव्हीसारखेच आहेत. ही कार चीनमध्ये २ सीटर आणि ४ सीटर पर्यायात उपलब्ध केली जाणार आहे. ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हेईकल (GSEV) प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करण्यात आली आहे.