TATA ची नवी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च, 1Km चा खर्च केवळ 10 पैसे; मिळतोय 6000 रुपयांचा डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 11:42 PM2023-07-07T23:42:51+5:302023-07-07T23:44:10+5:30

झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलसोबत उच्च दर्जाची, म्हणजेच 36-volt/6 Ah क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते, असा दावा कंपनीने केला आहे.

TATA Launches New Electric Bicycle, 1Km Costs Only 10 Paise; Getting a discount of Rs.6000 | TATA ची नवी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च, 1Km चा खर्च केवळ 10 पैसे; मिळतोय 6000 रुपयांचा डिस्काउंट

TATA ची नवी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च, 1Km चा खर्च केवळ 10 पैसे; मिळतोय 6000 रुपयांचा डिस्काउंट

googlenewsNext

टाटा इंटरनॅशनल लिमिटेडची कंपनी असलेल्या स्ट्रायडरने जिटा रेंजची नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. जिटा प्लस असे या इलेक्ट्रिक सायकलचे नाव आहे. पर्यावरण स्वच्छ असावे, असे ज्या लोकांना वाटते अशांसाठी ही खास सायकल लॉन्च करण्यात आली आहे. या लॉन्च इव्हेटवेळी स्ट्राइडरचे बिझनेस हेड राहुल गुप्ता म्हणाले, स्ट्राइडर जीटा प्लस 26,995 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आली आहे. मात्र, ही किंमत लिमिटेड कालावधीसाठीच असेल. यानंत, हिची किंमत 6000 रुपयांनी वाढविण्यात येईल.

दमदार बॅटरी, देऊ शकते 30 किलोमीटरपर्यंत रेंज -
झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलसोबत उच्च दर्जाची, म्हणजेच 36-volt/6 Ah क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल जवळपास 30 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते आणि पॅडल न मारता जास्तीत जास्त २५ किलोमीटर प्रतितास वेगाने चालू शकते. महत्वाचे म्हणजे, केवळ तीन ते चार तासांतच ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होते, असे कंपनीने म्हटले आहे. 

ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क -
या सायकलला ऑटो-कट ब्रेक आणि दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. तसेच सायकलच्या हँडल बारवर SOC डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. यावर बॅटरीची रेन्ज आणि वेळ यासंदर्भात माहिती देण्यात आली नाही. महत्वाचे म्हणजे, ही सायकल कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर धावू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. 

1Km चा खर्च केवळ 10 पैसे -
या सायकलला केवळ 10 पैसे प्रति किलोमीटर एवढा खर्च येतो. अर्थात यामुळे लोकांची मोठी सेव्हिंग होईल. या ब्रँडचे प्रोडक्ट देशभरात 4,000 हून अधिक रिटेल स्टोर्सवर विकले जातात.

Web Title: TATA Launches New Electric Bicycle, 1Km Costs Only 10 Paise; Getting a discount of Rs.6000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.