TATA बाजारात धमाका करणार...! 4 नव्या इलेक्ट्रिक SUV मैदानात उतरवणार, 2024 च्या सुरुवातीपर्यंत होणा लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:18 AM2023-08-10T11:18:50+5:302023-08-10T11:19:34+5:30

बाजारातील आपले स्थान आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, कंपनीने 2024 च्या सुरुवातीलाच 4 नव्या इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याची योजना आखली आहे. सध्या कंपनी आपल्या काही नव्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करत आहे.

tata motors announced that the 4 new electric SUVs to be launched by early 2024 | TATA बाजारात धमाका करणार...! 4 नव्या इलेक्ट्रिक SUV मैदानात उतरवणार, 2024 च्या सुरुवातीपर्यंत होणा लॉन्च

TATA बाजारात धमाका करणार...! 4 नव्या इलेक्ट्रिक SUV मैदानात उतरवणार, 2024 च्या सुरुवातीपर्यंत होणा लॉन्च

googlenewsNext


देशातील टाटा मोटर्स सध्या इलेक्ट्रिक पॅसेन्जर व्हेइकल सेगमेन्टमध्ये बाजारातील तब्बल 80 टक्क्यांहून अधिकच्या हिस्सेदारीसह आघाडीवर आहे. कंपनीच्या Tiago, Tigor आणि Nexon SUV सारख्या इलेक्ट्रिक कार बाजारात आहेत. बाजारातील आपले स्थान आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, कंपनीने 2024 च्या सुरुवातीलाच 4 नव्या इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याची योजना आखली आहे. सध्या कंपनी आपल्या काही नव्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करत आहे.

नवी टाटा नेक्सन इलेक्ट्रिक -
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही सप्टेंबर 2023 पर्यंत लॉन्च केली जाईल. हिचे सध्याचे मॉडेल सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्हीपैकी एक आहे. हे नवे मॉडेल कर्व्ह कन्सेप्टवर आधारीत आहे. या एसयूव्हीमध्ये नवे डायमंड कट फ्रंट ग्रिल, एलईडी डीआरएलसह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवे अॅलॉय व्हील, एलईडी लाइट बारसह अपडेटेड टेल-लॅम्प आणि नवे टेलगेट बघायला मिळू शकतात. याशिवाय या कारमध्ये, फ्लॅट-बॉटम, टू-स्पोक स्टीअरिंग व्हील, एक नवे 7-इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, एक मोठे 10.25-इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आणि एक नवे डॅशबोर्ड लेआउट मिळेल. या कारमध्ये सध्याच्या मॉडेल प्रमाणेच 30.2kWh आणि 40.5kWh चा बॅटरी पॅक मिळू शकतो. जो अनुक्रमे 312 किमी आणि 453 किमी पर्यंत रेन्ज देईल.

टाटा हॅरियर ईव्ही
ऑटो एक्स्पो 2023 मध्ये टाटा मोटर्सने हॅरियर एसयूव्हीची ईव्ही कॉन्सेप्ट आणली होती. ही कार या वर्षाच्या अखेरपर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. ही कार GEN 2 (SIGMA) प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आली आहे. या कारला एक नवे ब्लॅक-ऑफ ग्रिल, अपडेटेड बम्पर, नव्या एलईडी लाइट बारसह स्प्लिट हेडलॅम्प आणि अँग्युलर क्रीज दिले जातील. या कारमध्ये वाहनापासून लोड (V2L) आणि वाहनपासून वाहन (V2V) अशी चार्जिंग क्षमता देण्यात आली आहे. या कारची रेन्ज 400-500 किमी एवढी असण्याची शक्यता आहे.

टाटा पंच ईव्ही -
कंपनीकडून पंच ईव्हीचे टेस्टिंग सुरू आहे. हिचे डिझाइन ICE मॉडेल प्रमाणे असेल. या कारमध्ये काही ईव्ही-स्पेसिफिक डिझाइन एलिमेन्ट समाविष्ट केले जातील. यात एक ट्विन-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि रोटरी ड्राईव्ह सिलेक्टरही देण्यात येईल. या कारला 24kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे, जो Tiago EV मध्ये देखील देण्यात आला आहे. ही कार साधारणपणे 300 किमीची रेंज देणे अपेक्षित आहे. 

टाटा कर्व ईव्ही -
टाटा मोटर्सने 2023 ऑटो एक्सपोमध्ये कर्व एसयूव्ही कॉन्सेप्ट प्रदर्शित केली होती. हे नवे मॉडेल इलेक्ट्रिकसह पेट्रोल/डिझेल इंजिनच्या पर्यायांतही सादर केले जाईल. यात 400 किमीहून अधिक रेन्ज मिळेल. यासाठी यात एक मोठा 40kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. हिचा सामना एमजी जेडएस ईव्ही आणि ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक सोबत असेल.
 

Web Title: tata motors announced that the 4 new electric SUVs to be launched by early 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.