Tata Motors नंतर Maruti Suzuki आणि Toyota नं दिला ग्राहकांना दिलासा; केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:17 PM2021-05-12T18:17:49+5:302021-05-12T18:19:18+5:30

यापूर्वी TATA Motors नं दिला होता ग्राहकांना दिलासा. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय.

Tata Motors followed by Maruti Suzuki and Toyota to provide relief to customers; Kelly made a big announcement | Tata Motors नंतर Maruti Suzuki आणि Toyota नं दिला ग्राहकांना दिलासा; केली मोठी घोषणा

Tata Motors नंतर Maruti Suzuki आणि Toyota नं दिला ग्राहकांना दिलासा; केली मोठी घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वी TATA Motors नं दिला होता ग्राहकांना दिलासा.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय.

TATA Motors नंतर आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी  Maruti Suzuki India नं आपल्या ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक राज्यांनी लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर मारूती सुझुकी इंडियानं १२ मे रोजी आपल्या कारची फ्री सर्व्हिसिंग आणि वॉरंटी ३ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ मार्च ते ३१ मे दरम्यान ज्या ग्राहकांच्या कारची मोफत सर्व्हिस आणि वॉरंटी संपणार आहे त्यांच्यासाठी हा नियम लागू होणार आहे. 

मारूती सुझुकी व्यतिरिक्त Toyota Kirloskar Motor नं आपल्या गाड्यांची वॉरंटी आणि कस्टमर पेड एक्सटेंडेड वॉरंटी पिरिअड एका महिन्यानं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत, त्या ठिकाणच्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.

टोयोटाकडून प्रीपेड पॅकेजला मुदतवाढ

टोयोटानं प्रीपेड सर्व्हिस पॅकेजला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा कस्टमर कनेक्ट प्रोग्राम 2.0 अंतर्गत येणाऱ्या ग्राहकांना मिळेल. दरम्यान कंपनी आपल्या ग्राहकांना सहाय्य करेल आणि फ्रन्टलाईन वर्कर्सद्वारे वापरण्यात येणाऱ्या गाड्याही कंपनी सॅनिटाईज करून देत आहे, अशी माहिती टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट नवीन सोनी यांनी सांगितलं.

यापूर्वी TATA Motors कडून दिलासा

ज्या ग्राहकांची वॉरंटी आणि फ्री सर्व्हिस १ मे आणि ३१ मे पर्यंत ड्यू आहे ते ३० जूनपर्यंत फायदा घेऊ शकतील अशी घोषणा टाटा मोटर्सनं ११ मे रोजी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ग्राहकांना आपल्या गाड्यांचा मेन्टेनन्स करता येत नाहीये. यामुळे कंपनीनं हा मोठा निर्णय धेतला आहे. 
 

Web Title: Tata Motors followed by Maruti Suzuki and Toyota to provide relief to customers; Kelly made a big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.