होळीपूर्वी TATA ने ग्राहकांना दिला धक्का, सर्व कारच्या किमती वाढवल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 02:55 PM2022-03-14T14:55:12+5:302022-03-14T14:55:42+5:30
TATA Motors : वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार किंमती वाढवण्याऐवजी, कंपनीने यावेळी सर्व कारच्या किमती 3,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.
नवी दिल्ली : होळीपूर्वी सूट देण्यासोबतच टाटा मोटर्सने (TATA Motors) ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 सुरू होताच, कंपनीने आपल्या लाइनअपमधील बहुतेक कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये Tata Nexon, Tata Altroz, Tata Punch, Tata Harrier, Tata Safari, Tata Tiago, Tata Tigor यांसारख्या कारचा समावेश आहे.
वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार किंमती वाढवण्याऐवजी, कंपनीने यावेळी सर्व कारच्या किमती 3,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. दरम्यान, व्हेरिएंटनुसार, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे.
TATA Nexon
टाटा नेक्सॉन पेट्रोल मॉडेलमध्ये XE, XM, XM(S), XMA, XMA(S), XZ, XZ+, XZ+(O), XZ+ DT आणि XZ+ DT(O) सारख्या व्हेरिएंटच्या किमती 3000 रुपयांनी वाढल्या आहेत. तसेच, टाटा नेक्सॉन डिझेल मॉडेलमध्ये XM, XM(S), XMA(S), XZ+, XZ+ (O), XZ+ Dark, XZ+ (O) Dark, XZA+ Dark, XZA+ DT, XZA+ DT(O) सारख्या व्हेरिएंटच्या किमतींमध्ये 3000 रुपयांनी वाढ झाली आहे.
TATA Harrier
टाटा मोटर्सने हॅरियरच्या XE, XM आणि XMZ व्हेरिएंटच्या किमती 3000 रुपयांनी वाढवल्या आहेत. तर, टाटा सफारीचे XE, XM, XMA, XT, XT+, XT+ Dark, XTA+, XTA+ Dark, XZ, XZ+ 6S Dark, XZ+ Dark, XZ+ Gold, XZ+ Gold 6S, XZA, XZA+ 6S Dark, XZA+ Dark, XZA+ Gold, आणि XZA + Gold 6S सारख्या व्हेरिएंटच्या किमती 3000 रुपयांनी वाढल्या आहेत.
TATA Tiago & Tigor
टाटा मोटर्सने आपल्या सर्वात स्वस्त कार टाटा टिआगोच्या XE, XT, XTA, XTO, XZ, XZ+ DT New, XZA+ DT New, XZA+ च्या किमती वाढवल्या आहेत. तसेच, टाटा टिगोरच्या XE, XM, XMA, XZ, XZ + New, XZ + DT New, XZA + DT New आणि XZA + सारखे व्हेरिएंट देखील 3000 रुपयांनी महाग झाले आहेत.
TATA Punch & Altroz
नुकत्याच लाँच झालेल्या मायक्रो एसयूव्ही टाटा पंचच्याही (SUV Tata Punch) किमती वाढवल्या आहेत आणि आता अकॉम्पलिश, अकॉम्पलिश एएमटी, अकॉम्पलिशडझल, अकॉम्पलिश डझल एएमटी, अॅडव्हेंचर, अॅडव्हेंचर एएमटी, अॅडव्हेंचर रिदम, अॅडव्हेंचर रिदम एएमटी, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह एएमटी, क्रिएटिव्ह आयआरए, क्रिएटिव्ह एएमटी आणि प्युअर व्हेरिएंट 3000 रुपयांपर्यंत महाग झाल्या आहेत. कंपनीच्या प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोझ डिझेल मॉडेल्समध्ये XE, XE+, XM+, XT, XZ, XZ(O) आणि XZ+ तसेच टाटा अल्ट्रोझ पेट्रोल मॉडेल्समध्ये XE+, XM+, XT, XT TC, XZ, XZ TC (O), XZ TC, XZ (O), XZ +, XZ + Dark, XZ + TC आणि XZ + TC Dark व्हेरिएंटच्या किमतीत 3000 रुपयांनी वाढ झाली आहे.