Ratan Tata: रतन टाटांचा व्यवहार फसला; या कंपनीत पुन्हा 28 हजार कोटी गुंतवावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 01:02 PM2021-08-01T13:02:20+5:302021-08-01T13:05:27+5:30

Ratan Tata dealing with JLR: टाटा ही कंपनी सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये या कंपनीला देत असतात. गेल्या वर्षीदेखील टाटाने 9,800 कोटी रुपये गुंतविले होते. 

Tata Motors to invest Rs 28,900 crore in JLR; Ratan Tata purchased Jaguar in 2008 | Ratan Tata: रतन टाटांचा व्यवहार फसला; या कंपनीत पुन्हा 28 हजार कोटी गुंतवावे लागणार

Ratan Tata: रतन टाटांचा व्यवहार फसला; या कंपनीत पुन्हा 28 हजार कोटी गुंतवावे लागणार

googlenewsNext

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी एका बड्या कंपनीवर डाव खेळला होता. परंतू त्यांचा हा व्यवहार फसल्यात जमा आहे. ही कंपनी आता टाटा मोटर्सवर (Tata Motors) ओझे बनू लागली आहे. यामुळे टाटा मोटर्सला आपला डोलारा सांभाळून दरवर्षी एक मोठी रक्कम या कंपनीमध्ये गुंतवावी लागत आहे. (Tata Motors group's investment for this fiscal is pegged at Rs 28,900 crore, mostly for its British arm Jaguar Land Rover (JLR), company Chairman N Chandrasekaran said on Friday.)

Ratan Tata: रतन टाटांनी त्यांच्या गुरुचा फोटो शेअर केला; युजर म्हणाले, तुम्ही महान आहात!

टाटा ट्रस्टचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी 2008 मध्ये लक्झरी वाहन निर्माता कंपनी जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) विकत घेतली होती. असे म्हटले जाते की, एकेकाळी रतन टाटा टाटा मोटर्सची विक्री करण्यासाठी फोर्डकडे गेले होते. तेव्हा फोर्डच्या मालकाने आम्ही तुमच्यावर टाटा मोटर्स विकत घेऊन उपकार करत आहोत, असे म्हटले होते. काही वर्षांनी रतन टाटांनी टाटा मोटर्स नफ्यात आणलीच परंतू फोर्डकडची जग्वार विकत घेतली. तेव्हा त्याच फोर्डच्या मालकाने जग्वार विकत घेऊन तुम्ही आमच्यावर उपकार करत असल्याचे म्हटले होते. 

Insurance tips: नशा, अपघात, मृत्यू... क्लेम रिजेक्ट; या 8 कारणांमुळे विम्याचे पैसे मिळत नाहीत

काहीही असले तरी देखील हा सौदा टाटा मोटर्सला डोईजड ठरत आहे. रतन टाटांनी 1990 ते 2012 पर्यंत टाटा ग्रुपचे अध्यक्षपद भूषविले आहे. या काळात ते टाटा ट्रस्टचे मानद अध्यक्षही होते. रतन टाटांनी त्यांच्या दैदिप्यमान कारकीर्दीमध्ये अनेक कंपन्या विकत घेतल्या आणि त्या आज चांगल्या स्थितीतही आहेत. मात्र, ही एक अशी कंपनी आहे ज्याचा व्यवहार फसला आहे. 

TATA: टाटा पुन्हा रिलाँच करणार बंद केलेली कार; 2020 मध्ये अचानक उत्पादन थांबवलेले

टाटा ही कंपनी सुरु ठेवण्यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये या कंपनीला देत असतात. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी शुक्रवारी कंपनीच्या व्हर्च्युअल एजीएममध्ये सांगितले की, जग्वारमध्ये या आर्थिक वर्षात जवळपास 25 हजार कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत. गेल्या वर्षीदेखील टाटाने जग्वार लँड रोव्हरमध्ये 19,800 कोटी रुपये गुंतविले होते. 

TATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट

इलेक्ट्रीक व्हेईकल 
टाटा कंपनी इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनासाठी वेगळा निधी गोळा करणार आहे. मध्यम ते दीर्घ काळासाठी इलेक्ट्रीक व्हेईकल मधून मिळणारे उत्पन्न 25 टक्के करणार आहे. सध्या यातून 2 टक्के महसूल मिळत आहे. टाटा मोटर्समध्ये 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. 

Web Title: Tata Motors to invest Rs 28,900 crore in JLR; Ratan Tata purchased Jaguar in 2008

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.