Tiago हॅचबॅकवर मोठा डिस्काउंट; 23,000 रुपयांपर्यंत करा बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:17 PM2022-07-14T17:17:38+5:302022-07-14T17:18:05+5:30
Tata Motors : किंमती वाढल्यानंतर आता या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : टाटा मोटर्सने (Tata Motors) या महिन्यात आपल्या सर्वात स्वस्त कारटाटा टियागो (Tata Tiago) वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट जाहीर केला आहे. हा डिस्काउंट 23000 पर्यंत आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी टाटाने या कारच्या किमती वाढवल्या होत्या. किंमती वाढल्यानंतर आता या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे.
Tata Tiago वर काय आहे ऑफर?
कंपनी Tata Tiago च्या XE, XM आणि XT व्हेरिएंटवर एकूण 13,000 रुपयांचा डिस्काउंट आणि 10,000 रुपायंचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस देत आहे. XZ आणि इतर व्हेरिएंटवर कंपनी एकूण 23,000 रुपयांची सवलत देत आहे. ज्यामध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस आहे.
टियागो महागली
टाटा मोटर्सने गेल्या 60 दिवसांत टाटा टियागोच्या किमती दोन वेळा वाढवल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच याची किंमत 2 हजारांनी वाढवली होती. त्यानंतर आता नवीन किंमत (बेस व्हेरिएंटसाठी) 5.37 ऐवजी 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) झाली आहे. तसेच आता याचा टॉप एंड व्हेरिएंट 7.79 लाख रुपयांऐवजी 7.81 लाख रुपयांमध्ये उपलब्ध असेल. याआधीही या मॉडेलच्या किमती 15 हजारांवरून 46000 हजारपर्यंत वाढवण्यात आल्या होत्या.
इंजिन आणि मायलेज
Tata Tiago मध्ये 3-सिलेंडर 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 86 PS ची कमाल पॉवर आणि 113 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्डता ऑप्शन मिळतो. या कारला 35 लिटर क्षमतेची इंधन टाकी मिळते. कंपनीचा दावा आहे की, ही कार 20.09 kmpl मायलेज देते.
काय आहे डायमेंशन?
Tata Tiago ला 2400mm चा व्हीलबेस मिळतो. या कारची रुंदी 1677 मिमी, लांबी 3765 मिमी आणि उंची 1535 मिमी आहे.