Tata Motors ने केली ‘या’ कंपनीसोबत भागीदारी; वाहन खरेदीवर होणार मोठा फायदा, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 03:44 PM2021-11-09T15:44:23+5:302021-11-09T15:45:22+5:30
Tata Motors आणि Equitas SFB यांच्या कराराअंतर्गत ग्राहकांना आकर्षक आर्थिक स्कीमचा लाभ मिळेल.
नवी दिल्ली: देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी असलेल्या Tata Motors ने आता एका कंपनीसोबत भागीदारी केली असून, यामुळे ग्राहकांना टाटाचीवाहने खरेदी करताना आकर्षक योजनांचा मोठा फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. टाटा मोटर्स कंपनीने सर्वांत मोठ्या लघु वित्त बँकांपैकी एक असलेल्या Equitas SFB सोबत ५ वर्षांचा करार केला आहे.
Tata Motors आणि Equitas SFB यांच्या कराराअंतर्गत ग्राहकांना आकर्षक आर्थिक स्कीमचा लाभ मिळेल. टाटा मोटर्सच्या स्मॉल कमर्शियल व्हेईकल (SCV) रेंजच्या खरेदीवर या भागीदारीमुळे फायदा होईल. इच्छुक खरेदीदारांसाठी वित्तपुरवठा सुलभ करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे, असे सांगितले जात आहे.
ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देईल
Tata Motors या भागीदारीअंतर्गत देशातील ८६१ शाखांमध्ये पसरलेल्या Equitas SFB चे मजबूत नेटवर्क आणि ५५० हून अधिक कमर्शियल व्हेईकल (CV) ग्राहक टचपॉईंट वापरून ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देईल. टाटा मोटर्सकडून पहिले व्यावसायिक वाहन खरेदी करणाऱ्यांना यामुळे फायदा होईल, असे म्हटले जात आहे. आमच्या बँकिंग प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर टाटा मोटर्स लिमिटेडशी जोडले गेल्याचा आम्हाला आनंद होत आहे. या भागीदारीद्वारे, इक्विटास, टाटा मोटर्स लिमिटेडकडून त्यांचे पहिले व्यावसायिक वाहन खरेदी करण्यासाठी गरजुंना मदत करेल. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी समाजातील वंचित आणि वंचित घटकांच्या प्रगतीवर नेहमीच विश्वास ठेवला आहे, असे Equitas ने या करारानंतर म्हटले आहे.
दरम्यान, टाटा मोटर्सने २००५ मध्ये भारतातील पहिल्या चार-चाकी मिनी-ट्रक Ace सह स्मॉल कमर्शियल व्हेईकल सेगमेंट सुरू केले आणि तेव्हापासून या विभागात विस्तार करतेय. टाटा एस आणि टाटा इंट्रा ही लास्ट माइल वाहतुकीसाठी सेगमेंटमधील पसंतीची वाहने आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच अलीकडेच टाटा मोटर्सने एकाच दिवशी कमर्शिअल व्हेइकल सेगमेंटमध्ये २१ वाहन लॉंच करून धमाका केला होता. हा एक रेकॉर्ड असल्याचेही बोलले जात आहे.