टाटा मोटर्सकडून नेक्सॉन, हॅरियर व सफारीचे रेड डार्क एडिशन लाँच; जाणून घ्या किंमत, इंजिन आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 03:47 PM2023-02-23T15:47:31+5:302023-02-23T15:47:51+5:30

Tata Motors : या स्पेशल एडिशन एसयूव्हीमध्ये अनेक नवीन फीचर्ससह सादर करण्यात आल्या आहेत.

Tata Motors Launched Red Dark Edition Of Nexon Harrier And Safari Know Price Engine Features | टाटा मोटर्सकडून नेक्सॉन, हॅरियर व सफारीचे रेड डार्क एडिशन लाँच; जाणून घ्या किंमत, इंजिन आणि फीचर्स

टाटा मोटर्सकडून नेक्सॉन, हॅरियर व सफारीचे रेड डार्क एडिशन लाँच; जाणून घ्या किंमत, इंजिन आणि फीचर्स

googlenewsNext

टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतीय बाजारपेठेत आपल्या एसयूव्ही (SUV) लाइन-अपची रेड डार्क (Red Dark) एडिशन सादर केली आहे. टाटा नेक्सॉन (Tata Nexon), हॅरियर (Harrier) आणि सफारीच्या (Safari) नवीन रेड डार्क एडिशन्स भारतात 12.35 लाख रुपये, एक्स-शोरूम पासून सुरू होणाऱ्या किंमतीसह लाँच केल्या गेल्या आहेत. 

या स्पेशल एडिशन एसयूव्हीमध्ये अनेक नवीन फीचर्ससह सादर करण्यात आल्या आहेत, ज्यात कनेक्टेड कार टेक आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) सह मोठ्या टचस्क्रीन सिस्टमचा समावेश आहे. नवीन टाटा नेक्सॉन रेड डार्क एडिशनची किंमत 12.35 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टाटा हॅरियर आणि सफारीच्या रेड डार्क एडिशनची किंमत 21.77 लाख आणि 22.61 लाख रुपये आहे, सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.

Tata Nexon, Harrier, Safari Red Dark एडिशनची  बुकिंग प्रोसेस
टाटा मोटर्सच्या रेड एडिशनअंतर्गत ऑफर करण्यात आलेल्या नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी खरेदी करण्यासाठी, ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बुकिंग करू शकतात किंवा त्यांच्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरशिपला भेट देऊन ऑफलाइन देखील बुक करू शकतात. या तीन एडिशनच्या बुकिंगसाठी कंपनीने 50,000 रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे.

Tata Nexon, Harrier, Safari Red Dark एडिशनमध्ये नवीन काय आहे?
या टाटा एसयूव्हीच्या डार्क रेड एडिशनमध्ये ओबेरॉन ब्लॅक शेड आहे. फीचर्सच्या बाबतीत हॅरियर आणि सफारीला कनेक्टेड कार टेकसह एक मोठी 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7.0-इंच डिजिटल  टीएफटी क्लस्टर, सहा एअरबॅग्ज, एक 360-डिग्री कॅमेरा, एडीएएस सुद्धा मिळत आहे. याशिवाय, आता त्यांना 3 वर्षे किंवा 1 लाख किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी मिळत आहे.

Tata Nexon, Harrier, Safari Red Dark एडिशनचे कसे आहे इंजिन आणि ट्रान्समिशन? 
टाटा मोटर्सने या तीन एसयूव्हीचे इंजिन पूर्वीप्रमाणेच ठेवले आहे. परंतु या इंजिनला आरडीई आणि ई 20 फ्यूल असलेले बनवले आहे. हॅरियर आणि सफारी रेड डार्क एडिशनला 6-स्पीड MT/AT सह 170 bhp 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. दुसरीकडे, टाटा नेक्सॉनमध्ये 118bhp 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 108bhp 1.2-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. ज्यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड AMT ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे.

Web Title: Tata Motors Launched Red Dark Edition Of Nexon Harrier And Safari Know Price Engine Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.