टाटा मोटर्सतर्फे भारताचा सर्वात मोठा टिपर ट्रक 'सिग्‍ना ४८२५.टीके' लाँच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 03:13 PM2020-08-17T15:13:36+5:302020-08-17T15:13:54+5:30

देशाचा पहिला १६ चाक, ४७.५ टन वजन असलेला टिपर ट्रक

Tata Motors launches India's largest tipper truck 'Signna 4825.TK' | टाटा मोटर्सतर्फे भारताचा सर्वात मोठा टिपर ट्रक 'सिग्‍ना ४८२५.टीके' लाँच

टाटा मोटर्सतर्फे भारताचा सर्वात मोठा टिपर ट्रक 'सिग्‍ना ४८२५.टीके' लाँच

googlenewsNext

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज कोळसा व बांधकामाच्‍या वाहतुकीसाठी भारताचा पहिलाच ४७.५ टन मल्‍टी-अॅक्‍सल टिपर ट्रक 'सिग्‍ना ४८२५.टीके' लाँच केला. हा ट्रक एकूण वाहन वजन २९ घन मीटर बॉक्‍स लोड क्षमतेसह प्रतिट्रिप अधिक भार घेऊन जाण्‍याची सुविधा देते. 


हा ट्रक टाटा मोटर्सच्‍या पॉवर ऑफ ६ तत्त्वासह विकसित करण्‍यात आला आहे. हा नवीन ट्रक सुधारित कार्यक्षमता, उच्‍च पेलोड क्षमता, मालकीहक्‍काचा कमी खर्च, ड्रायव्‍हरसाठी उच्‍च आरामदायी सुविधा व सुरक्षिततेची खात्री देतो. यामध्ये कमिन्‍स आयएसबीई ६.७ लिटर बीएस-६ प्रमाणित इंजिन आहे. २५० एचपीची उच्‍च शक्‍ती आणि १००० ते १७०० आरपीएममध्‍ये ९५० एनएम टॉर्क देते. तसेच जी११५० ९-स्‍पीड गिअरबॉक्‍ससह ४३० मिमी डाय ऑर्गेनिक क्‍लच देण्यात आला आहे.


टिपर ट्रकमध्‍ये ३ वैशिष्‍ट्यपूर्ण ड्राइव्‍ह मोड्स आहेत - लाइट, मेडियम व हेवी. ज्‍यामधून उच्‍च भार व प्रदेशानुसार अधिकतम शक्‍ती व टॉर्कचा वापर होण्‍यासोबत उच्‍च इंधन कार्यक्षमता मिळते. ग्राहकांना हा टिपर १०x४, १०x२ या दोन पर्यायात उपलब्‍ध आहे. 


तसेच या ट्रकमध्‍ये मोठी स्‍लीपर केबिन, टिल्‍ट अॅण्‍ड टेलिस्‍कोपिक स्टिअरिंग सिस्‍टम, ३-वे मेकॅनिकली-अॅडजस्‍टेबल आरामदायी ड्रायव्हिंग सीट आणि ईझी-शिफ्ट गिअर्स अशी प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत. सिग्‍ना ४८२५.टीकेचे सस्‍पेंडेड केबिन कमी एनव्‍हीएच वैशिष्‍ट्यांची खात्री देते. शक्तिशाली एअर कंडिशनिंग यंत्रणा सर्व वातावरणीय स्थितींमध्‍ये आरामदायी ड्रायव्हिंगची सुविधा देते. अपघातासंदर्भात चाचणी करण्‍यात आलेली केबिन, उच्‍च आसन स्थिती, मोठे डेलाइट ओपनिंग, रिअर व्‍ह्यू आरसा, ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट आरसा, भक्‍कम स्‍टील ३-पीस बंपर अशी वैशिष्‍ट्ये या ट्रकला देशातील सर्वात सुरक्षित टिपर ट्रक बनवतात.

Web Title: Tata Motors launches India's largest tipper truck 'Signna 4825.TK'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.