डिझेल मॉडेल इतकी झाली या Electric Car ची मागणी; सिंगल चार्जमध्ये ३०० किमीची रेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 16:38 IST2021-07-31T16:33:47+5:302021-07-31T16:38:15+5:30
TATA Motors ची ही कार ठरली सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रीक प्रवासी कार. सध्या देशात इलेक्ट्रीक कार्सची वाढतेय मागणी.

डिझेल मॉडेल इतकी झाली या Electric Car ची मागणी; सिंगल चार्जमध्ये ३०० किमीची रेंज
सध्या देशात पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत. अशातच देशात आता इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढण्यास सुरूवात झाली आहे. टाटा मोटर्सनं देशात आपली इलेक्ट्रीक कार Nexon EV लाँच केल्यानंतर त्या कारला उत्तम मागणीही मिळत आहे. तसंच Nexon EV ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.
दरम्यान, आपल्या डिझेल गाडीच्या विक्री इतकी Nexon EV ची मागणी वाढल्याचा दावा टाटा मोटर्सनं केला आहे. "जुलै २०२१ मध्ये Nexon EV ची डिझेल व्हेरिअंट इतकीच विक्री झाली," अशी माहिती एका पत्रकार परिषदेदरम्यान टाटा मोटर्सचे चीफ फायनॅन्शिअल ऑफिसर पीबी बालाची यांनी दिली. FAME-II बेनिफिट्समुळे आणि राज्य सरकारांकडून देण्यात येणाऱ्या सब्सिडीमुळे ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांकडे आकर्षित होत असल्याचं ते म्हणाले.
२०२५ पर्यंत १० इलेक्ट्रीक वाहनं
नेक्सॉन ईव्हीची विक्री ही लवकरच एकूण विक्रीच्या ५ टक्क्यांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा कंपनीकडून करण्यात येत आहे. २०२२ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टाटा मोटर्सनं नेक्सॉन ईव्हीच्या एकूण १,७६६ युनिट्सची विक्री केली आहे. तर यादरम्यान कंपनीच्या एकूण ५३,८०० गाड्यांची विक्री झाली. दरम्यान नेक्सॉन ईव्हीची वाढती विक्री पाहून कंपनीनं २०२५ पर्यंत एकूण १० इलेक्ट्रीक व्हेईकल्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. या कारची ड्रायव्हिंग रेंज उत्तम असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल ३०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. या कारसोबत फास्ट चार्जरही देण्यात येत असून एका तासात बॅटरी ८० टक्के चार्ज होते.