कार खरेदी करणाऱ्यांसाठी शानदार संधी, TATA च्या कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 11:24 AM2022-02-05T11:24:39+5:302022-02-05T11:25:02+5:30

Tata Motors : पनीने फेब्रुवारी 2022 मध्ये मॉडेलच्या आधारावर आपल्या सर्व कारवर 60,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत.

tata motors offer huge discounts across its range in february 2022 | कार खरेदी करणाऱ्यांसाठी शानदार संधी, TATA च्या कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट!

कार खरेदी करणाऱ्यांसाठी शानदार संधी, TATA च्या कारवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट!

googlenewsNext

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून टाटा मोटर्सच्या (Tata Motors) विक्रीत मोठी वाढ दिसून येत आहे. कंपनीने डिसेंबर 2021 आणि जानेवारी 2021 मध्ये ह्युंडाईला (Hyundai) मागे टाकत विक्रीत दुसरे स्थान मिळवले आहे. इतर वाहन निर्माता कंपन्यांच्या विक्रीच्या बाबतीत निराशा दिसून आली असली तरी आता टाटा मोटर्सची जादू चालताना दिसत आहे. जोरदार विक्रीनंतरही टाटा मोटर्स थांबण्याचे नाव घेत नाही आणि कंपनीने फेब्रुवारी 2022 मध्ये मॉडेलच्या आधारावर आपल्या सर्व कारवर 60,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत.

टाटा हॅरियर
टाटा हॅरियर (Tata Harrier) वर एकूण 60,000 रुपयांपर्यंतची ऑफर मिळत आहे. जी स्टॉक शिल्लक असेपर्यंत दिली जात आहेत. कंपनी 2021 मॉडेल हॅरियरवर 20,000 रुपयांची रोख सूट आणि 2022 मॉडेलवर 40,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. हॅरियर डार्क एडिशनवर 20,000 पर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. कॉर्पोरेट ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात आला आहे.

टाटा सफारी
टाटाने सफारी एसयूव्हीवर (Safari SUV) एकूण 60,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे, जी उर्वरित 2021 मॉडेल्सवर दिली जात आहे. 2022 मॉडेल टाटा सफारीवर एकूण 40,000 रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात आला आहे, तर कंपनीने एसयूव्हीच्या गोल्ड एडिशनवर ग्राहकांना कोणताही लाभ दिलेला नाही.

टाटा टिआगो आणि टिगोर
टाटा मोटर्सने टिआगोवर (Tiago) 30,000 रुपयांपर्यंत एकूण ऑफर दिल्या आहेत, ज्यात 10,000 रुपयांपर्यंत रोख सूट आणि 20,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस समाविष्ट आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या टिआगो सीएनजीवर (Tiago CNG) कोणतीही ऑफर मिळालेली नाही. तर टिगोर कॉम्पॅक्ट सेडानवर 25,000 रुपयांपर्यंतचे एकूण फायदे उपलब्ध आहेत आणि येथेही टिगोर कारच्या सीएनजी मॉडेलवर कोणताही लाभ नाही.

टाटा नेक्सॉन आणि अल्ट्रोज
टाटा नेक्सॉनवर (Tata Nexon) कंपनीने ग्राहकांना एकूण 15,000 रुपयांपर्यंतचा लाभ दिला आहे, जो एक्सचेंज बोनस म्हणून दिला जात आहे. कॉर्पोरेट ग्राहकांना 10,000 रुपयांचा फायदा मिळेल. कंपनीच्या प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजवर ( Altroz)एकूण 10,000 रुपयांचा लाभ मिळत आहे, जो फक्त कॉर्पोरेट ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

Web Title: tata motors offer huge discounts across its range in february 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.