TATA च्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर खरेदी करण्याची होईल इच्छा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:31 PM2022-04-08T16:31:56+5:302022-04-08T16:32:46+5:30

TATA Motors : कंपनीने Tata Tiago, Tata Tigor, Tata Harrier आणि Tata Safari वर विविध सवलती दिल्या आहेत.

tata motors offering huge discounts on its popular cars in april 2022 | TATA च्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर खरेदी करण्याची होईल इच्छा! 

TATA च्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर खरेदी करण्याची होईल इच्छा! 

Next

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून टाटा मोटर्सच्या (TATA Motors) विक्रीत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. विक्री आणखी वाढवण्यासाठी कंपनीने एप्रिल 2022 मध्ये जोरदार ऑफर दिल्या आहेत. कंपनीने Tata Tiago, Tata Tigor, Tata Harrier आणि Tata Safari वर विविध सवलती दिल्या आहेत. यामध्ये रोख सवलत/ग्राहक ऑफर, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. कंपनीने या कारवर ग्राहकांना एकूण 45,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले आहेत. 

टाटा टिआगो (Tata Tiago)
एप्रिलमध्ये टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय हॅचबॅक टिआगोवर 23,000 रुपयांपर्यंतचा लाभ देत आहे. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 5.22 लाख रुपये आहे. कंपनीने कारच्या XE, XM आणि XT व्हेरिएंटवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला आहे, तर कॉर्पोरेट सवलतीसाठी 3,000 रुपयांचा फायदा होईल. एक्सचेंज आणि यापेक्षा महाग व्हेरिएंट्सवर कंपनी 10,000 रुपयांची ग्राहक सूट देत आहे. तसेच 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि  3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.

टाटा टिगोर (Tata Tigor)
ही कंपनीची एक अतिशय लोकप्रिय सेडान आहे, ज्यावर एकूण 23,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.82 लाख रुपये आहे. टिगोरचे XE आणि XM व्हेरिएंटवर 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सवलत मिळत आहे. कारच्या एक्सचेंज आणि याहून अधिक महाग व्हेरिएंटवर 10,000 रुपयांपर्यंत ग्राहक सूट देण्यात येत आहे. तसेच, 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 3,0000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

टाटा हॅरियर (Tata Harrier)
टाटा मोटर्सच्या शक्तिशाली एसयूव्ही हॅरियरला 45,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर मिळाल्या आहेत, ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 14.53  लाख रुपये आहे. हॅरियरच्या XE आणि XM व्हेरिएंटवर 40,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे.

टाटा सफारी (Tata Safari)
काही काळापूर्वी सफारी नेमप्लेट भारतात परत आली आहे आणि आता कंपनी या एसयूव्हीवर एकूण 40,000 रुपयांपर्यंतचा फायदा देत आहे. या एसयूव्हीची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 15.02 लाख रुपये आहे. कंपनीने सफारीच्या XE आणि XM व्हेरिएंटवर 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला आहे.

Web Title: tata motors offering huge discounts on its popular cars in april 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.