Tata Motors EV Company: टाटा मोटर्स मोठा गेम खेळली! 700 कोटींची नवी कंपनी काढली; मारुती, ह्युंदाई पाहतच राहीली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 06:27 PM2021-12-23T18:27:02+5:302021-12-23T18:28:20+5:30

Tata Motors EV subsidiary: टाटाने या मोठ्या निर्णयाची बुधवारी घोषणा केली. मंत्रालयाने याला मंजुरी दिली असून 21 डिसेंबर, 2021 मध्ये याचे प्रमाणपत्र देखील जारी केले आहे. 

Tata Motors played a big game! 700 crore new company for Electric Vehicles | Tata Motors EV Company: टाटा मोटर्स मोठा गेम खेळली! 700 कोटींची नवी कंपनी काढली; मारुती, ह्युंदाई पाहतच राहीली

Tata Motors EV Company: टाटा मोटर्स मोठा गेम खेळली! 700 कोटींची नवी कंपनी काढली; मारुती, ह्युंदाई पाहतच राहीली

googlenewsNext

टाटा मोटर्सने (Tata Motors) ऑटोमोबाईल बाजारात मोठा गेम खेळला आहे. इलेक्ट्रीक वाहनांना पेट्रोल, डिझेल वाहनांपासून वेगळे करत नवीन कंपनी काढली आहे. यासाठी कंपनीने 700 कोटी रुपये गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे टाटाच्या इलेक्ट्रीक गाड्या ही नवीन कंपनी बनविणार आहे.

टाटाच्या इलेक्ट्रीक वाहनांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. टाटा नेक्सॉन ही फाईव्ह स्टार सेफ्टीसह इलेक्ट्रीक मध्येही मिळत आहे. शिवाय चांगली रेंजही देते. टाटाने आणखी एक कार टिग़ॉर इलेक्ट्रीकमध्ये लाँच केली आहे. आता आणखी काही मॉडेल्स इलेक्ट्रीकमध्ये येणार आहेत. यामुळे टाटाने इलेक्ट्रीक वाहने वेगळ्या कंपनीकडे असावीत असा निर्णय घेतला आहे. ही टाटाच्याच मालकीची उप कंपनी असणार आहे. 

टाटाने या मोठ्या निर्णयाची बुधवारी घोषणा केली. टाटाच्या संपूर्ण मालकीच्या नव्या कंपनीचे नाव Tata Passenger Electric Mobility Limited (TPEML) (टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड) (टीपीईएमएल) असे आहे. टाटने सांगितले की, मंत्रालयाने याला मंजुरी दिली असून 21 डिसेंबर, 2021 मध्ये याचे प्रमाणपत्र देखील जारी केले आहे. 

टाटा मोटर्सने बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, "टीपीईएमएल इलेक्ट्रिक वाहने/इलेक्ट्रिक मोबिलिटी, सर्व प्रकारच्या हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन, डिझाइन, विकास किंवा वीज, बॅटरी, सौर उर्जा, किंवा इतर कोणत्याही विद्युत उपकरणांद्वारे चालणारी वाहने; इंजिन, मोटर्स, भाग, घटक, उपकरणे आणि संबंधित उपकरणे, तसेच असेंब्ली, फॅब्रिकेशन, उत्पादन विक्री, स्थापनेसाठी आणि विक्रीनंतरचे उपक्रम आदी या कंपनीच्या अंतर्गत येणार आहेत.''

टाटा मोटर्सने सांगितले की, टीपीईएमएलला 10 रुपये प्रत्येक शेअरच्या दराने 70 कोटी इक्विटी शेअरची अधिकृत रक्कमेसोबत सहभागी करण्यात आले आहे. जे एकूण 7 अब्ज रुपये होते. हे सर्व शेअर आणि रक्कम टीएमएलकडे असणार आहे. 
 

Web Title: Tata Motors played a big game! 700 crore new company for Electric Vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा