Tata Motors च्या या एसयुव्हीला तुफान डिमांड; काही महिन्यांतच 10000 चा आकडा पार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:00 PM2021-07-27T16:00:23+5:302021-07-27T16:00:48+5:30
Tata Motors Safari SUV in Demand: टाटाने नवी सफारी ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर बनविली आहे. याच प्लॅटफॉर्मवर लक्झरिअस एसयुव्ही Land Rover बनविली जाते. महत्वाचे म्हणजे टाटाची हॅरिअरदेखील OMEGARC डिझाईनवरच बनविण्यात आले आहे. हा लँडरोव्हरचा D8 प्लेटफॉर्म आहे.
Tata Motors ने पुण्यातील उत्पादन प्रकल्पात नुकत्याच लाँच झालेल्या Safari SUV च्या 10000 व्या युनिटचे उत्पादन केले आहे. याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली. टाटा मोटर्सने फेब्रुवारीमध्ये ही सात सीटर एसयुव्ही लाँच केली होती. या महिन्यात 100 युनिट उत्पादन झाले होते. मात्र, त्यानंतरच्या चार महिन्यांत 9900 कारचे उत्पादन करण्यात आले आहे. (Tata says that the first 100th unit of the new Safari was rolled out in February 2021.)
नव्या टाटा सफारीला डायनामिक डिझाइन, आरामदायक थ्री-रो सीटिंग, प्रीमियम इंटीरियर, कीन ड्राइव्हिंग एक्सपीरिअंस आणि सुरक्षा सुविधांनी युक्त बनविल्याचे कंपनीने सांगितले आहे.
All-New SAFARI is now a 10K strong family. And, it's your passion to #ReclaimYourLife, which has driven us past this milestone.
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) July 27, 2021
Stay tuned for some legendary #Safari10KCelebrations that are coming soon! ✨✨✨
.
.#TataSafari#ReclaimYourLife#Safari10KCelebrations#TataMotorspic.twitter.com/Nc0ilnypSV
टाटा सफारीमध्ये थ्री-रो एसयूव्ही च्या मधल्या सीटमध्ये एक बेंच सीटसोबत सहा सीटचा ऑप्शन देण्यात आला आहे. तर दुसऱ्या रो मध्ये कॅप्टन सीटसोबत सात सीटचा ऑप्शन देण्यात आला आहे. हॅरिअरसारखेच डिझाईन देण्यात आले आहे. टाटाने नवी सफारी ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर बनविली आहे. याच प्लॅटफॉर्मवर लक्झरिअस एसयुव्ही Land Rover बनविली जाते. महत्वाचे म्हणजे टाटाची हॅरिअरदेखील OMEGARC डिझाईनवरच बनविण्यात आले आहे. हा लँडरोव्हरचा D8 प्लेटफॉर्म आहे.
Kryotec इंजिन : टाटा मोटर्सचे डिझेल इंजिन खूप ताकदवान मानले जातात. या SUV मध्ये कंपनीने 2.0 लीटर क्षमतेचे Kryotec टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. जे 170hp आणि 350 एनएम चा पीक टॉर्क तयार करते. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स ने हे इंजिन लेस आहे. सफारीला XE, XM, XT, XT +, XZ आणि XZ + मध्ये आणण्यात आले आहे. ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसोबत कार 14.8 kmpl मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.
तसेच या कारमध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठी सनरुफ पहायला मिळणार आहे. टाटा सफारी पहिल्यांदा 1998 मध्ये लाँच झाली होती.