Tata Motors Sale : टाटा मोटर्सच्या गाड्यांची तुफान विक्री; जानेवारी महिन्यात केला रकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 09:23 PM2022-02-01T21:23:42+5:302022-02-01T21:24:04+5:30

डिसेंबरमध्ये ह्युंदाई मोटरला (Hyundai Motors) मागे टाकून देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनल्यानंतर जानेवारीमध्ये विक्रीचा नवा विक्रमही कंपनीनं प्रस्थापित केला.

Tata Motors Sale record sale of Tata Motors vehicles Record made in the month of January know more details electric passenger vehicles | Tata Motors Sale : टाटा मोटर्सच्या गाड्यांची तुफान विक्री; जानेवारी महिन्यात केला रकॉर्ड

Tata Motors Sale : टाटा मोटर्सच्या गाड्यांची तुफान विक्री; जानेवारी महिन्यात केला रकॉर्ड

googlenewsNext

टाटा मोटर्सच्या (Tata Motors) गाड्यांची जानेवारी महिन्यात मोठी विक्री झाली आहे. डिसेंबरमध्ये ह्युंदाई मोटरला (Hyundai Motors) मागे टाकून देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनल्यानंतर जानेवारीमध्ये विक्रीचा नवा विक्रमही कंपनीनं प्रस्थापित केला. कंपनीच्या देशांतर्गत वाहन विक्रीत गेल्या महिन्यात २६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती टाटा मोटर्सनं दिली. Tata Motors ने जानेवारी 2022 मध्ये एकूण 72,485 युनिट्सची (प्रवासी आणि व्यावसायिक) विकल्या आहेत. यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये कंपनीने केवळ 57,649 युनिट्सची विक्री केली होती.

मात्र, प्रवासी वाहनांबाबत सांगायचे झाल्यास त्यात कंपनीनं आणखी मोठी झेप घेतली आहे. टाटा मोटर्सने या वर्षी जानेवारी महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. कंपनीने प्रवासी वाहनांच्या 40,777 युनिट्सची विक्री केली आहे, जी या विभागातील टाटा मोटर्सची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 26,978 तर डिसेंबरमध्ये 35,299 कार्सची विक्री केली होती.

Punch आणि Nexon चा वाटा मोठा
कंपनीच्या या विक्रीत सर्वात मोठा वाटा टाटा पंच आणि टाटा नेक्सॉनचा आहे. या दोन्ही वाहनांच्या विक्रीने मिळून 10,000 युनिट्सचा आकडा पार केला आहे. सीएनजी गाडीलाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारी 2022 मध्ये 3,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली. लाँचच्या पहिल्या महिन्यात Tiago आणि Tigor च्या एकूण विक्रीत CNG व्हेरिअंटचा वाटा 42 टक्के होता. त्याच वेळी, पुण्यातील प्लांटने मार्च 2007 नंतर सर्वाधिक मासिक उत्पादन नोंदवले आहे.

टाटा मोटर्सची इलेक्ट्रीक वाहन विक्री जानेवारीमध्ये पाच पटीने वाढून 2,892 युनिट्सवर पोहोचली. कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 514 इलेक्ट्रीक वाहनांची विक्री केली. यामध्ये Tata Nexon EV आणि Tigor EV यांचा समावेश आहे. अलीकडेच कंपनीने Tata Nexon EV च्या एकूण विक्रीने 13,500 युनिट्सचा टप्पा ओलांडला असून ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रीक कार असल्याचे कंपनीने सांगितले होते.

Web Title: Tata Motors Sale record sale of Tata Motors vehicles Record made in the month of January know more details electric passenger vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.