Tata Motors च्या दुसऱ्या ईव्हीची झलक दिसली; 60 मिनिटांत होते 80 टक्के चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 02:34 PM2021-08-18T14:34:48+5:302021-08-18T14:35:07+5:30

Tata Tigor Electric Car Unveiled:  Tata Tigor EV ची विक्री 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. टिगॉर ईव्ही या आधी सरकारी कार्यालयांनाच आणि खासगी टॅक्सी कंपन्यांना दिली जात होती. आता ती सर्वासाठी खुली केली जाणार आहे. शिवाय या कारची रेंजही दुप्पट केली जाणार आहे. 

Tata Motors second electric car Tigor EV unveiled | Tata Motors च्या दुसऱ्या ईव्हीची झलक दिसली; 60 मिनिटांत होते 80 टक्के चार्ज

Tata Motors च्या दुसऱ्या ईव्हीची झलक दिसली; 60 मिनिटांत होते 80 टक्के चार्ज

Next

देशाची दिग्गज वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने भारतात आज टिगोर ईव्ही प्रदर्शित केली आहे. कंपनीने या कारला पोर्टफोलियोमध्ये नेक्सॉन ईव्हीच्या खाली ठेवले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार Tata Tigor इलेक्ट्रीक कार 5.7 सेकंदांत 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग पकडते. या कारची बुकिंगही सुरु झाली आहे. (Tata Motors on Wednesday unveiled an all-new Tigor EV.)

2021 Honda Amaze Facelift : होंडाची Amaze फेसलिफ्ट लाँच; मारुती डिझायरला टक्कर देणार

Tata Tigor EV ची विक्री 31 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. टिगॉर ईव्ही या आधी सरकारी कार्यालयांनाच आणि खासगी टॅक्सी कंपन्यांना दिली जात होती. आता ती सर्वासाठी खुली केली जाणार आहे. शिवाय या कारची रेंजही दुप्पट केली जाणार आहे. 
जर तुम्हाला Tigor EV खरेदी करयाची असेल तर कंपनीची वेबसाईट किंवा जवळच्या टाटा मोटर्सच्या शोरुमवर जावे लागणार आहे. Tata Motors च्या दाव्यानुसार 2021 Tigor EV देशातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रीक सेदान आहे. या कारमध्ये 26 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. 

टाटा मोटर्सची नवीन Mini SUV येणार; निस्सान मॅग्नाईट, रेनो काइगरला टक्कर देणार

देशातील सर्वात स्वस्त ईव्ही कार...
या कारला फास्ट चार्जरच्या माध्यमातून केवळ 60 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज केले जाऊ शकते. सोबतच नेक्सॉन ईव्हीसारखे रीजेनरेटिव ब्रेकिंग सुविधा आहे. कंपनी या कारवर 8 वर्षे किंवा 1.60 लाख किमी बॅटरी आणि मोटर वॉरंटी देते. या कारची किंमत सध्याच्या पेट्रोल टिगॉरपेक्षा दीड ते दोन लाख रुपयांनी जास्त असू शकते. टिगॉर पेट्रोलची किंमत 7.81 लाख रुपये आहे. याकारची किंमत 10 लाखांत असू शकते.

Tigor EV मध्ये हेडलँप्स आणि 15 इंचाचे अल़ॉय व्हील्सवर ब्ल्यू हायलाईट देण्यात आली आहे. प्रोजेक्टर हेडलँप सोबत नवीन फॉग लँप आणि LED DRLs देण्यात आले आहे.

Web Title: Tata Motors second electric car Tigor EV unveiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.