टाटा मोटर्सने ‘पॉवर ऑफ ६’ एक्‍स्‍पोमध्‍ये दाखवले अत्‍याधुनिक तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 04:09 PM2022-09-19T16:09:30+5:302022-09-19T16:09:48+5:30

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांची श्रेणी ७६ वर्षांहून अधिक काळ राष्ट्रनिर्मितीत योगदान देत आहे.

Tata Motors showcases state-of-the-art technology at 'Power of 6' Expo | टाटा मोटर्सने ‘पॉवर ऑफ ६’ एक्‍स्‍पोमध्‍ये दाखवले अत्‍याधुनिक तंत्रज्ञान

टाटा मोटर्सने ‘पॉवर ऑफ ६’ एक्‍स्‍पोमध्‍ये दाखवले अत्‍याधुनिक तंत्रज्ञान

googlenewsNext

टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी १९ व २० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईमध्‍ये ‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पोचे आयोजन केले आहे. या दोन दिवसांच्‍या एक्‍स्‍पोचे लक्ष्य ग्राहकांमध्ये टाटा मोटर्सच्या मोबिलिटी सोल्यूशन्सबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे आहे. या एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सच्या एमएचआयसीव्‍ही (मध्यम, जड आणि मध्यवर्ती व्यावसायिक वाहने)च्या विस्तृत श्रेणीतील निवडक मॉडेल्स आणि ग्राहक केंद्रित मूल्यवर्धित सेवा ऑफरसह संपूर्ण सेवा उपक्रमांतर्गत वार्षिक देखभाल करार, फ्लीट व्यवस्थापन, अपटाइम गॅरंटी, इंधन कार्यक्षमता व्यवस्थापन उपक्रम दाखवण्‍यात येतील.

‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पो कंपनीचे प्रगत कनेक्टेड वाहन प्लॅटफॉर्म फ्लीट एज व त्‍याची कार्यक्षमता आणि फ्लीट मालकांच्या नफ्याची क्षमता सुधारण्यासाठी क्षमतांचे प्रदर्शन देखील करेल.  ‘पॉवर ऑफ ६’ एक्स्पो आमच्या परिसंस्‍था भागधारकांना आमच्या नवीनतम ऑफर समजून घेण्यास आणि अनुभवण्यास सक्षम करेल.

टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांची श्रेणी ७६ वर्षांहून अधिक काळ राष्ट्रनिर्मितीत योगदान देत आहे. बांधकाम आणि मालवाहतूक विभागातील अग्रणी कंपनीने २ लाखांहून अधिक बीएस-६ एमएचआयसीव्‍ही ट्रक्‍स सादर केले आहेत. ही श्रेणी विविध लोड बॉडी प्रकार, टिपर, टँकर, बल्कर्स आणि ट्रेलर्स अशा फुली-बिल्‍ट रचनांमध्‍ये उपलब्‍ध आहे. एमएचसीव्‍ही ट्रक्‍सची श्रेणी मार्केट लोड, शेती, सिमेंट, लोखंड व स्‍टील, कंटेनर, वाहन वाहक, पेट्रोलियम, रसायन, पाण्याचे टँकर, एलपीजी, एफएमसीजी, व्‍हाइट गूड्स, नाशवंत वस्तू, बांधकाम, खाणकाम, नगरपालिका कार्यसंचालने अशा सर्वसमावेशक मालांच्या वाहतूकीच्‍या गरजांची पूर्तता करत आहे. टाटा मोटर्सची आयसीव्‍ही श्रेणी डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध आहे. ही श्रेणी रचना, कार्यक्षमता आणि विविध उपयोजनांसाठी प्रसिद्ध आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ई-कॉमर्स विभागाच्या खास गरजा पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकांना नफा वाढविण्यात मदत करण्यासाठी ही श्रेणी तयार करण्यात आली आहे.

Web Title: Tata Motors showcases state-of-the-art technology at 'Power of 6' Expo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा