Tata Nexon EV एकमेव! 50000 विक्रीचा टप्पा गाठला; कापले तब्बल 900 दशलक्ष किमींचे अंतर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 04:02 PM2023-06-28T16:02:25+5:302023-06-28T16:03:10+5:30

टाटाने भारतात इतिहास रचला आहे. Tata Nexon EV ला टाटाने २०२० मध्ये लाँच केली होती. नेक्सॉन ईव्ही भारतात ५०० हून अधिक शहरात विकली जात आहे.

Tata Nexon EV Achieved 50000 sales milestone; Covered a distance of 900 million km | Tata Nexon EV एकमेव! 50000 विक्रीचा टप्पा गाठला; कापले तब्बल 900 दशलक्ष किमींचे अंतर 

Tata Nexon EV एकमेव! 50000 विक्रीचा टप्पा गाठला; कापले तब्बल 900 दशलक्ष किमींचे अंतर 

googlenewsNext

Tata Nexon EV ने कमी वेळात कमाल केली आहे. सध्या सर्वत्र टाटा मोटर्सच्याच कारचा जलवा आहे. सुरक्षित आणि परवडणारी कार म्हणून टाटाच्या ईव्ही फ्लिटकडे पाहिले जात आहे. एवढे की भारतातील ईव्ही क्षेत्रातील टाटा ही सर्वात मोठी कंपनी बनली आहे. टाटाच्या नेक्सॉन ईव्हीने टाटाला मोठे यश दिले आहे. लाँच झाल्याच्या तीन वर्षांतच या ईव्हीचे ५० हजार युनिट विकले गेले आहेत. 

टाटाने भारतात इतिहास रचला आहे. Tata Nexon EV ला टाटाने २०२० मध्ये लाँच केली होती. नेक्सॉन ईव्ही भारतात ५०० हून अधिक शहरात विकली जात आहे. टाटाच्या नेटवर्कचा या ईव्हीला फायदा झाला आहे. याचबरोबर टाटाने वेगवेगळ्या रेंजच्या नेक्सॉन लाँच केल्या आहेत. वाढविलेल्या रेंजचाही टाटाला फायदा होत आहे. या कारमालकांनी आजवर 900 दशलक्ष किमीचे अंतर कापलेले आहे. टाटाच्या दाव्यानुसार ग्राहक १५०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी देखील नेक्सॉन ईव्हीचा वापर करत आहेत. कित्येक मालक हे १०० ते ४०० किमीचा प्रवास टाटाच्या नेक्सॉनमधून करत आहेत. भारतात चार्जिंगचे इन्फ्रास्ट्रक्चर एवढे विकसित नसले तरी हे शक्य झाले आहे. चार्जिंग स्टेशनमध्ये २०२१ ते २०२३ या काळात १५०० टक्क्यांची वाढ झालेली आहे. एकट्या टाटानेच 6,000 हून अधिक चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. 

Tata Nexon EV Prime (बेस मॉडेल) ची किंमत 14.49 लाख रुपये आणि Nexon EV Max ची उच्च आवृत्तीची प्रारंभिक किंमत 16.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, स्वयंचलित हवामान नियंत्रण, i-VBAC सह इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP), LED DRLs आणि LED टेल लॅम्पसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, पुश बटण स्टार्ट यांसारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. Nexon EV MAX XZ+ Lux ची किंमत 18.49 लाख रुपये आहे. याचबरोबत Nexon EV Prime XM देखील लाँच करण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होते.
 

Web Title: Tata Nexon EV Achieved 50000 sales milestone; Covered a distance of 900 million km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.