टाटाच्या या धाकड इलेक्ट्रिक SUV ला मिळणार डार्क एडिशन, देते 437km ची रेंज! जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 08:31 PM2023-04-13T20:31:52+5:302023-04-13T20:32:53+5:30
Tata Nexon EV Max Dark Edition ला केबिन सोबतच ओव्हरऑल ब्लॅक एक्सटीरिअर थीम मिळण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्सने (Tata Motors) देशात Nexon EV Max इलेक्ट्रिक SUV चे नवे व्हेरिअंट लॉन्च करण्यासाठी कंबर कसली आहे. टाटा मोटर्सने सोशल मिडिया हँडलवर एक टिझर शेअर केला आहे. यात Nexon EV Max ला लवकरच Nexon EV आणि Nexon EV प्राइम एडिशन सारखे डार्क एडिशन मिळेल, असा मेसेज दिला आहे. या टिझरमध्ये नव्या व्हेरिअंटची झलक दाखवत, हे 'द डार्क साइड ऑफ हाय-डेफिनेशन' आहे.
Tata Nexon EV Max Dark Edition ला केबिन सोबतच ओव्हरऑल ब्लॅक एक्सटीरिअर थीम मिळण्याची शक्यता आहे. नव्या व्हेरिअंटमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या इतर कॉस्मॅटिक अपडेटमध्ये चारकोल ग्रे अॅलॉय व्हील, पियानो-ब्लॅक डॅशबोर्ड आणि केबिनमध्ये ब्लॅक अपहोल्स्ट्रीचा समावेश आहे. याशिवाय, नेक्सॉन ईवी मॅक्सला अनेक नवे फीचर्स मिळण्याचीही शक्यत आहे. यात एका नव्या 10.25 इंचाच्या इंफोटेनमेंट स्क्रीनचाही समावेश असू शकतो.
Nexon EV Max ची किंमत -
टाटा मोटर्सने गेल्या मे महिन्यात, भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Nexon EV च्या लॉन्ग-रेंज व्हेरिअंटच्या रुपात पहिल्यांदाच Nexon EV Max सादर केली होती. ही कार 17.74 लाख रुपये या सुरुवातीच्या किंमतीवर लॉन्च केली होती. नेक्सॉन ईव्ही मॅक्स एकदा चार्ज केल्यानंतर 437km किलोमीटरची ARAI-प्रमाणित रेंज देते असा दावा आहे. Nexon EV Max भारतात MG ZS EV आणि Hyundai Kona EV सारख्या रायव्हलला टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात आली होती.
40.5 kWh बॅटरी पॅक -
टाटा मोटर्सने Nexon EV Max ला स्टँडर्ड व्हेरिअँटच्या तुलनेत मोठी बॅटरी दिली होती. 40.5 kWh बॅटरी पॅक Nexon EV मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी पॅकच्या तुलनेत 30% अधिक पॉवर फूल आहे. Nexon EV Max देखील Nexon EV पेक्षा अधिक पॉवर जनरेट करते. ही कार 143hp एवढी पॉवर आणि 250Nm चा पीक टार्क जनरेट करण्यास सक्षम आहे.