टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा...सगळे फेल! साडे सहा लाखांच्या या कारच्या प्रेमात पडला देश...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 02:02 PM2023-03-07T14:02:57+5:302023-03-07T14:03:38+5:30
Best Selling Car: तशा पहिल्या दहा बेस्ट सेलिंग कारमध्ये मारुतीचा दबदबा असला तरी यावेळी खालच्या नंबरला असणाऱ्या कारने बाजी मारली आहे.
फेब्रुवारी महिना संपला तसा कारच्या सेलचा आकडा समोर आला आहे. तशा पहिल्या दहा बेस्ट सेलिंग कारमध्येमारुतीचा दबदबा असला तरी यावेळी खालच्या नंबरला असणाऱ्या कारने बाजी मारली आहे. या साडे सहा लाखांच्या कारसमोर टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा आदी कार फोल ठरल्या आहेत.
मारुतीची प्रिमिअम हॅचबॅक कार Maruti Suzuki Baleno ही फेब्रुवारीतील सर्वाधिक खपाची कार बनली आहे. गेल्या महिन्यात मारुतीच्या अल्टोने बाजी मारली होती. बलेनोने पुन्हा एकदा पहिला नंबर पटकावला आहे. गेल्या काही काळापासून बलेनो कारची विक्री कमी झाली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये 18,592 लोकांनी बलेनो कार खरेदी केली.
चला पाहुयात देशातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या कार..
बलेनोची विक्री गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत 48 टक्क्यांनी वाढली आहे. मारुतीची स्विफ्ट दुसऱ्या नंबरवर आहे. या कारची विक्री चार टक्क्यांनी घसरली आहे. तिसऱ्या नंबरवर Maruti Suzuki Alto कार आहे. स्विफ्ट 18,412 लोकांनी तर अल्टो 18,114 लोकांनी खरेदी केली आहे.
चौथ्या नंबरवर WagonR आहे. ही कार 16,889 लोकांनी खरेदी केली. पाचव्या नंबरवर Suzuki Dzire आहे, तिची विक्री 16,798 झाली. मारुती सुझुकी ब्रेझा सहाव्या क्रमांकावर असून 15,787 कार विकल्या गेल्या. Tata Nexon ला 13,914 ग्राहकांनी खरेदी केले. मारुती सुझुकी Eeco आठव्या क्रमांकावर असून Hyundai Creta ला 10,421 लोकांनी खरेदी केले.
मारुती सुझुकी बलेनोची एक्स-शोरूम किंमत 6.56 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉपचे म़ॉडेल 9.83 लाख रुपयांपर्यंत जाते. बलेनोचे मायलेज 22.94 kmpl पर्यंत आहे.