Tata Nexon Variants Discontinued: Tata Nexon चे सहा व्हेरिअंट कंपनीने एकाचवेळी बंद केले; किंमतही वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 01:35 PM2022-11-07T13:35:44+5:302022-11-07T13:36:12+5:30
भारतीय बाजारात नेक्सॉन 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल अशा दोन इंजिन प्रकारात येते.
टाटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या टाटा नेक्सॉनचे कंपनीने एकाचवेळी सहा व्हेरिअंट बंद करून टाकले आहेत. टाटा नेक्सॉनच्या लाईनअपमध्ये कंपनीने मोठे बदल केले आहेत. हे व्हेरिअंट अधिकृत वेबसाईटवरून देखील हटविण्यात आले आहेत. भारतीय बाजारात नेक्सॉन 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल अशा दोन इंजिन प्रकारात येते.
XZ, XZA, XZ+ (O), XZA+ (O), XZ+ (O) डार्क आणि XZA+ (O) डार्क हे सहा व्हेरिअंट बंद करण्यात आले आहेत. यामुळे नेक्सॉन आता XZ+ (HS), XZ+ (L) आणि XZ+ (P) या तीन व्हेरिअंटमध्येच उपलब्ध असणार आहे. बेस मॉडेल 7.60 लाख रुपयांना मिळेल. या तीन व्हेरिअंटसोबत काझीरंगा आणि जेट व्हेरिअंट उपलब्ध असणार आहे. यात बेस मॉडेल म्हणून XE पेट्रोल मॅन्युअल ट्रिम, डिझेलमध्ये XM मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक पर्यायामध्ये XMA AMT पर्याय असेल.
Tata Nexon मध्ये 1.2L टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5L डिझेल इंजिन आहे. पेट्रोल इंजिन 118bhp पॉवर निर्माण करते, तर डिझेल इंजिन 108bhp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही दोन्ही इंजिने 6-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सशी जोडलेली आहेत. तसेच, नेक्सॉनची इलेक्ट्रिक आवृत्ती देखील पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
Nexon पेट्रोल आवृत्तीची किंमत 7.60 लाख रुपयांपासून सुरू होते, जी टॉप मॉडेलसाठी 13.75 लाख रुपयांपर्यंत जाते. डिझेल बेस मॉडेल 9.90 लाख रुपयांना उपलब्ध आहे. टॉप मॉडेल 13.43 लाख रुपयांना आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.