दणकट टाटा नेक्सॉनचे नवे व्हेरिअंट आले; जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 03:42 PM2020-09-02T15:42:03+5:302020-09-02T15:43:18+5:30
Tata Nexon XM(S) व्हेरिअंटमध्ये नेक्सॉन एक्सएमची आधीची वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत.
मुंबई : टाटा मोटर्स या भारताच्या आघाडीच्या ऑटोमोटिव्ह ब्रॅण्डने आज टाटा नेक्सॉनचे एक्सएम(एस) व्हेरिअंट लाँच केले. ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांची पूर्तता करण्याच्या, तसेच प्रिमिअम वैशिष्ट्ये अधिक किफायतशीर दरामध्ये उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नामध्ये कंपनीने आता ८.३६ लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) इलेक्ट्रिक सनरूफ असलेली एक्सएम(एस) व्हेरिअन्ट आणले आहे.
इलेक्ट्रिक सनरूफसह एक्सएम(एस) व्हेरिअन्टमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, रेन सेन्सिंग वायपर्स व स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्स अशी वैशिष्ट्ये आहेत. या व्हेरिअंटमध्ये नेक्सॉन एक्सएमची आधीची वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, एलईडी डीआरएलसह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, ड्रायव्हर व को-ड्रायव्हर एअरबॅग्ज, हिल होल्ड कंट्रोल, हार्मनची कनेक्ट नेक्स्ट इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि मल्टी-ड्राइव्ह मोड्स (इको, सिटी व स्पोर्ट). यासोबत अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
पेट्रोल व डिझेल व्हेरिअन्टमध्ये नेक्सॉन मॅन्युअल व एएमटी या दोन्ही ट्रान्समिशनमध्ये येईल. सविस्तर किंमती खालीलप्रमाणे आहेत.
पेट्रोल डिझेल
एक्सएम (एस) मॅन्युअल ८.३६ लाख रूपये ९.७० लाख रूपये
एक्सएमए (एस) एएमटी ८.९६ लाख रूपये १०.३० लाख रूपये
टाटाच्या या नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयुव्हीचा मुकाबला ह्युंदाई व्हेन्यू, मारुती सुझुकी ब्रिझा, महिंद्रा XUV300, फोर्ड इकोस्पोर्ट आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे. टाटा नेक्सॉनच्या ड्यूल-क्लच ट्रांसमिशन (DCT) वरही काम सुरु आहे. येत्या काळात हे मॉडेलही लाँच केले जाईल.
Nexon EV आधीपासूनच बाजारात
टाटानं Nexon EV लॉन्च केली आहे. या कारची किंमत 13.99 लाखांपासून सुरू होईल. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातली ही टाटाची पहिली कार असून देशातली सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. Tata Nexon Electric तीन व्हेरिंयटमध्ये ( XM, XZ+ आणि XZ+ LUX) उपलब्ध आहे. Tata Nexon ची स्पर्धा एमजी ZS EV आणि ह्युंदाई कोनाशी होईल. मात्र या दोन्ही कारची किंमत नेक्सॉनपेक्षा जास्त आहे. टाटा नेक्सॉनच्या ईव्हीमध्ये 30.2 kWh लिथियम-आयनची बॅटरी देण्यात आली. ही बॅटरी कारच्या फ्लोरखाली आहे. पूरपरिस्थितीतही ही बॅटरी सुरक्षित राहील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर नेक्सॉन 312 किलोमीटर अंतर कापेल. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरनं 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तासांचा कालावधी लागतो. तर फास्ट चार्जरनं नेक्सॉनची बॅटरी ० ते ८० टक्क्यांपर्यंत ६० मिनिटांमध्ये चार्ज होते.