Tata Nexon XZ व्हेरिएंट भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 12:05 PM2018-03-27T12:05:32+5:302018-03-27T12:05:32+5:30
कंपनीने Tata Nexon XZ व्हेरिएंट भारतात लाँच केलंय.
नवी दिल्ली : Tata Motors मोटर्सने आपल्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एसयूवी Nexon व्हेरिएंटमध्ये विस्तार केलाय. कंपनीने Tata Nexon XZ व्हेरिएंट भारतात लाँच केलंय.
Tata Nexon XZ कारच्या लाँच वेळी टाटा मोटर्सचे हेड-मार्केटिंग विवेक श्रीवास्तव म्हणाले की, आम्ही नवनवीन प्रॉडक्ट तयार करण्यासोबतच आमच्या ब्रँडला आणखी मजबूत करण्यावरही भर देत आहोत. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आम्ही Nexon च नवीन व्हेरिएंट लाँच केलं आहे. Tata Nexon XZ मध्ये १४ नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
काय आहेत फीचर्स?
Tata Nexon XZ मध्ये १४ नवीन प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर्स आत्तापर्यंत केवळ XZ+ ट्रिममध्ये उपलब्ध होते. नव्या व्हेरिएंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, इलेक्ट्रीक फोल्डींग रिअर व्यू, फ्लॉटिंग डॅशटॉप टचस्क्रीन, व्हॉइस कमांड, व्हॉईस अलर्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ड्राईव्ह अवे लॉकिंग फीचर, हाईट अडजस्टेबल ड्राइवर सीट आणि सीटबेल्ट्स, रिअर एसी वेन्ट्स आणि डोर ट्रिमवर फॅब्रिक इन्सर्टसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
कोणते फीचर्स नाहीत?
Tata Nexon XZ मध्ये एलईडी डे-टाइम रनिंग लाईट, फ्रंट फॉग लॅम्प, रिअर फॉग लॅम्प, अलॉय व्हील, रिअर डिफॉगर, स्प्लिट फोल्डिंग रिअर सीट, सेंटर कंट्रोल, फ्रंट आर्मरेस्ट, स्मार्ट की, पुश स्टार्ट/स्टॉप बटन आणि रिअर सेंटर आर्म रेस्टसारखे फीचर्स दिले नाहीयेत.
रंगाचे पर्याय
ही कार ड्युअल टोन कलर स्कीममध्ये मिळणार असून ही एसयूवी ५ रंगामध्ये उपलब्ध होईल. Tata Nexon मध्ये १.२ लिटर Revotron टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर Revotorq टर्बो डिझेल इंजिनचा पर्याय आहे.
किती आहे किंमत?
या व्हेरिएंटच्या पेट्रोल इंजिनची दिल्ली एक्स - शोरूम किंमत ७. ९९ लाख रुपये आणि डिझेल इंजिनाची किंमत ८.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.