या स्वस्तातल्या SUV नं ह्युंदाई क्रेटाला दिला मोठा धक्का, आता निशाण्यावर Maruti Brezza

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:07 PM2023-09-07T18:07:51+5:302023-09-07T18:09:00+5:30

ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक विकलेल्या गेलेल्या टॉप-3 SUV संदर्भात बोलायचे झाल्यास, मारुती ब्रेझाचा क्रमांक सर्वात वरचा आहे.

tata punch gave a big blow to Hyundai Creta, now Maruti Brezza is next target | या स्वस्तातल्या SUV नं ह्युंदाई क्रेटाला दिला मोठा धक्का, आता निशाण्यावर Maruti Brezza

या स्वस्तातल्या SUV नं ह्युंदाई क्रेटाला दिला मोठा धक्का, आता निशाण्यावर Maruti Brezza

googlenewsNext

भारतीय ग्राहकांमध्ये SUV ची क्रेझ वाढताना दिसत आहे. देशात छोट्या आणि अफोर्डेबल एसयूव्हींची विक्री वाढत आहे. यात टाटा पंच, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई क्रेटाचाही समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक विकलेल्या गेलेल्या टॉप-3 SUV संदर्भात बोलायचे झाल्यास, मारुती ब्रेझाचा क्रमांक सर्वात वरचा आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर टाटा पंच तर तिसऱ्या स्थानावर ह्युंदाई क्रेटाचा क्रमांक लागतो. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, टाटा पंचने विक्रीच्या बाबतीत केवळ Hyundai Creta ला मागे टाकले नाही, तर Maruti Brezza च्याही अगदी जवळ पोहोचली आहे.

विक्रीचे आकडे -
ऑगस्ट महिन्यात ब्रेजा ही टॉप सेलिंग SUV ठरली. हिचे 14,572 युनिट्स विकल्या गेले. तर टाटा पंचच्या 14,523 युनिट्सची विक्री झाली. तसेच ह्युंदाई क्रेटाच्या 13,832 युनिट्सची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे, क्रेटा आणि पंचच्या विक्रितील अंतर मोठे आहे. पण पंच आणि ब्रेझाच्या विक्रीत फार कमी अंतर आहे. या दोहोंच्या विक्रित केळव 49 युनिट्सचाच फरक आहे. खरे तर पंचने फार कमी काळात बाजारावर आपली पकड निर्माण केली आहे. 
 
टाटा पंचची किंमत 6 लाख रुपयांपासून 9.52 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. यात 7.0 इंचाचे टचस्क्रीन सिस्टिम, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि वायपर, क्रूझ कंट्रोल, डुअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस आणि रिअर पार्किंग कॅमेऱ्यासारखे फीचर्स मिळतात. यह 5-सीटर मायक्रो एसयूव्हीआहे. यात 366 लिटरचा बूट स्पेस मिळतो. हिचा ग्राउंड क्लिअरन्स 187 मिलीमिटर एवढा आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशन
पंचमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन मिलते. हे इंजिन 86 पीएस आणि 113 एनएम टार्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. हिचे सीएनजी व्हेरिअंटदेखील बाजारात उपलब्ध आहे. मात्र सीएनजी मोडमध्ये पॉवर आउटपूट कमी होते. सीएनजी व्हेरिअंटमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळतो.
 

 

Web Title: tata punch gave a big blow to Hyundai Creta, now Maruti Brezza is next target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.