Tata Punch खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा! कारमधून हटवण्यात आली महत्वाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 11:34 AM2022-10-31T11:34:05+5:302022-10-31T11:35:09+5:30
टाटा पंच कार अल्पावधीच खूप लोकप्रिय झाली आहे. टाटा मोटर्सची ही एसयूव्ही गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये टॉप १० वाहनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती.
टाटा पंच कार अल्पावधीच खूप लोकप्रिय झाली आहे. टाटा मोटर्सची ही एसयूव्ही गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये टॉप १० वाहनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. या कारला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्ही देखील टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण टाटा मोटर्सने या कारच्या बेस व्हेरिअंटमध्ये काही बदल केले आहेत. या अपडेटमुळे कारमधील सर्वात महत्त्वाचे फिचर काढून टाकण्यात आलं आहे.
ज्यांना टाटा पंच विकत घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. टाटा मोटर्सनं या कारमधून स्टार्ट/स्टॉप फंक्शन काढून टाकले आहे. आता तुम्ही विचार करत असाल की असं करण्यामागचं नेमकं कारण काय? महागाईमुळे वाहनांच्या किमतीतही वाढ होत आहे, अशा परिस्थितीत कार उत्पादक दोन मार्गांचा अवलंब करत आहेत. एकीकडे काही कंपन्या कारच्या किमती वाढवत आहेत, तर दुसरीकडे काही कंपन्या त्यांच्या कारमधून काही फीचर्स काढून टाकत आहेत. कारची किंमत न वाढवता त्यातून काही फिचर्स काढून टाकले की कारच्या निर्मितीचा खर्च कमी येतो आणि ग्राहकांनाही अतिरिक्त किमतीचा फटका बसत नाही.
टाटा पंचला मिळालेत ५ स्टार
टाटा पंच कारला GNCAP (ग्लोबल NCAP) क्रॅश टेस्टमध्ये फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. ही एक परवडणारी एसयूव्ही बनली आहे की ज्या कारनं ५ स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. त्यामुळे ग्राहकांनाही ही कार पसंतीस पडत आहे.
Tata Punch Price
टाटा कारच्या बेस प्युअर व्हेरिएंटची किंमत ५.९३ लाख रुपये आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत ९ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे. ही एक्स शोरुम किंमत आहे.
Tata Punch Features
ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टीफंक्शन स्टिअरिंग कंट्रोल आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी वैशिष्ट्ये या कारमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसाठी ७-इंचाच्या इन्फोटेनमेंट सिस्टमसह सपोर्ट उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या असून कारच्या मागील बाजूस कॅमेरा आहे.