Exter ला घाबरली TATA? Punch मध्ये दिलं सर्वांचं फेव्हरिट फीचर, CNG चे डिटेल्स देखील लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 07:06 PM2023-07-28T19:06:36+5:302023-07-28T19:10:30+5:30

...यामुळे टाटा पंचची अडचण वाढू शकते. अशातच, टाटा मोटर्स आता पंच एसयूव्हीमध्ये दोन जबरदस्त फीचर्स अॅड करत आहे.

tata punch suv to offer Everyone's favorite feature sunroof CNG details were also leaked | Exter ला घाबरली TATA? Punch मध्ये दिलं सर्वांचं फेव्हरिट फीचर, CNG चे डिटेल्स देखील लीक

Exter ला घाबरली TATA? Punch मध्ये दिलं सर्वांचं फेव्हरिट फीचर, CNG चे डिटेल्स देखील लीक

googlenewsNext

नुकत्याच लॉन्च झालेल्या ह्युंदाई एक्स्टर एसयूव्हीची (Hyundai Exter SUV) तुलना टाटा पंचसोबत (Tata Punch) केली जात आहे. एक्स्टर सेगमेंटमध्ये या एकमेव कारला सनरूफ देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे कंपनीने ही कार सीएनजीमध्ये आणली आहे. यामुळे टाटा पंचची अडचण वाढू शकते. अशातच, टाटा मोटर्स आता पंच एसयूव्हीमध्ये दोन जबरदस्त फीचर्स अॅड करत आहे. कंपनी या कारला सनरूफ देणार आहे. याच बरोबर कंपनी सीएनजी व्हर्जनही लॉन्च करणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा Accomplish Dazzle ट्रिम आणि या वरच्या सर्व व्हेरिअंट्सना सनरूफ ऑफर करण्यासाठी सज्ज आहे. यामुळे आता आपण पेट्रोल व्हर्जन घ्या अथवा पेट्रोल+सीएनजी व्हर्जन घ्या, यात सनरूफचा पर्याय उपलब्ध असेल. लॉन्चपूर्वी Punch CNG चे डिटेल्सदेखील ऑनलाइन लीक झाले आहेत. मोटर एरेनाच्या रिपोर्टनुसार, टाटा मोटर्स अल्ट्रोज प्रमाणे एक ट्विन-सिलेंडर लेआउटचा वापर करणार आहे. या लेआऊटमुळे चांगला बूट स्पेस मिळतो. 

पंच सीएनजीमध्ये 1.2L चे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. पेट्रोल मोडवर हे इंजिन 87 बीएचपी पॉवर आणि 115 एनएमचा टॉर्क जनरेट करेल. तसेच सीएनजीसह हा 72 बीएचपी पॉवर आणि 102 एनएमचा टॉर्क जनरेट करेल. जो 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत जोडण्यात आला आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार, Pure Rhythm ट्रिम, Pure, Adventure, Adventure Rhythm, Accomplished, आणि Accomplished Dazzle सोडून जवळपास सर्वच व्हेरिअंटमध्ये सीएनजी पर्याय देण्याची कंपनीची योजना आहे.

Web Title: tata punch suv to offer Everyone's favorite feature sunroof CNG details were also leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.