TATA नेक्सॉन, टियागो, टिगोरवर बंपर ऑफर, तर Harrier आणि Safari वर मिळतोय हजारोंचा डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 12:54 PM2022-03-12T12:54:24+5:302022-03-12T12:58:25+5:30

तुम्ही टाटा मोटर्सची (TATA Motors) कार किंवा एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

tata suv and cars are available with up to 65000 bumper discount know details tata harrier nexon safari tago petrol diesel variant | TATA नेक्सॉन, टियागो, टिगोरवर बंपर ऑफर, तर Harrier आणि Safari वर मिळतोय हजारोंचा डिस्काऊंट

TATA नेक्सॉन, टियागो, टिगोरवर बंपर ऑफर, तर Harrier आणि Safari वर मिळतोय हजारोंचा डिस्काऊंट

googlenewsNext

तुम्ही टाटा मोटर्सची (TATA Motors) कार किंवा एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही काळात गाड्यांच्या झालेल्या उत्तम विक्रीमुळे आता टाटा मोटर्स डीलरशिप कंपनीच्या जवळपास सर्व वाहनांवर 65,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. रशलेनच्या रिपोर्टनुसार वाहनांवरील बंपर सवलतींमध्ये एक्सचेंजसह रोख आणि कॉर्पोरेट सूट यांचा समावेश करण्यात आलाय. कोणत्या टाटा कारवर डीलरशिप किती सवलत देत आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

हॅरिअर, सफारीवर सर्वाधिक डिस्काऊंट
या महिन्यात तुम्ही Tata Harrier (2021) आणि Safari (2021) बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. डीलरशिप पॉवरफुल SUV Harrier वर 20 हजार रोख सवलत, 40 हजार एक्सचेंज आणि 5 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट देत आहेत. त्याचबरोबर सफारीवर 20 हजार कॅश आणि एक्स्चेंजवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. परंतु सफारीवर कोणत्याही प्रकारचा कॉर्पोरेट डिस्काऊंट उपलब्ध नाही.

नेक्सॉन पेट्रोल, डिझेलवरही ऑफर
जर तुम्ही होळीच्या मुहूर्तावर नेक्सॉन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही डील अतिशय फायद्याची ठरू शकते. काही डीलरशिप नेक्सॉन पेट्रोल व्हेरियंटवर 3,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट बेनिफिट्स ऑफर करत आहेत. त्याच वेळी, नेक्सॉन डिझेल (2021) वर 15,000 रुपयांचा एक्सचेंज आणि 5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे. 

टियागोवरही बंपर डिस्काऊंट
तुम्ही या महिन्यातील Tata Tiago (2022) देखील बेस्ट डीलमध्ये खरेदी करू शकता. कंपनी Tiago वर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट देत आहे. ही ऑफर Tiago च्या XZ, XZA, XZ+, XZA+ पेट्रोल व्हेरियंटवर दिली जात आहे. त्याच वेळी, Tiago (2021) वर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काऊंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंटही ऑफर केला जात आहे.

Web Title: tata suv and cars are available with up to 65000 bumper discount know details tata harrier nexon safari tago petrol diesel variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.