Tata Tiago CNG, Maruti WagonR CNG: टाटा टियागो, मारुती वॅगनआर की ह्युंदाई सँट्रो? कोणती सीएनजी कार परवडणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:30 AM2022-01-20T09:30:48+5:302022-01-20T09:31:11+5:30

Tiago, WagonR, Santro CNG comparison: टाटा मोटर्सने नुकतीच टाटा टियागो सीएनजी कार लाँच केली. आता देशात सीएनजी कार विकणाऱ्या तीन कंपन्या आहेत. मारुतीकडे सर्वाधिक सीएनजी कार आहेत. तर टाटाकडे दोन आणि ह्युंदाईकडे तीन कार सीएनजीमध्ये आहेत.

Tata Tiago CNG, Maruti WagonR CNG or Hyundai Santro? Which CNG car is affordable | Tata Tiago CNG, Maruti WagonR CNG: टाटा टियागो, मारुती वॅगनआर की ह्युंदाई सँट्रो? कोणती सीएनजी कार परवडणारी

Tata Tiago CNG, Maruti WagonR CNG: टाटा टियागो, मारुती वॅगनआर की ह्युंदाई सँट्रो? कोणती सीएनजी कार परवडणारी

googlenewsNext

टाटा मोटर्सने नुकतीच टाटा टियागो सीएनजी कार लाँच केली. आता देशात सीएनजी कार विकणाऱ्या तीन कंपन्या आहेत. मारुतीकडे सर्वाधिक सीएनजी कार आहेत. तर टाटाकडे दोन आणि ह्युंदाईकडे तीन कार सीएनजीमध्ये आहेत. एन्ट्रीलेव्हल म्हणजेच हॅचबॅकमध्ये तिन्ही कंपन्यांच्या कार चांगले मायलेज देतात, परंतू सीएनजीमध्ये टाटा टियागो, मारुती वॅगनआर की ह्युंदाई सँट्रो घ्यायची असा प्रश्न लोकांना सतावू लागला आहे. 

जर टाटाची गोष्ट करायची झाली तर टाटाने अद्याप टियागोचे मायलेज किती ते जाहीर केलेले नाही. परंतू सेफ्टी फिचर्स आणि अन्य या सेगमेंटमधील फिचर्स उजवे ठरणार आहेत. टियागो सीएनजीची टक्कर मारुतीचा तीन आणि ह्युदाईच्या दोन कारशी टक्कर होणार आहे. सीएनजीमध्ये मारुतीच उजवा हात आहे. ह्युंदाईला तेवढा प्रतिसाद मिळत नाही. परंतू, आता टाटा देखील सीएनजी बाजारात आल्याने ही स्पर्धा तीव्र होणार आहे.  

Tata Tiago iCNG मध्ये १.२ लीटरचे बीएस ६ इंजिन देण्यात आले आहे. ११९९सीसी इंजिन ६००० आरपीएमवर 73.4 PS ताकद आणि 3500 आरपीएमवर 95 Nm चा पीक टॉर्क तयार करते. टाटा सीएनजीची एक्सशोरुम किंमत 6,09,900 रुपये आहे. टॉप व्हेरिअंटची किंमती 7,64,900 रुपयांवर जाते.

मारुती सुझुकीची वॅगनआर भारतात सर्वाधिक पसंतीची कार आहे. नवा लूक जबरदस्त आहे, तसेच सीएनजी मायलेजही चांगले आहे. LXi आणि LXi (O) मध्ये ही सीएनजी कार मिळते. यामध्ये १ लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 58 bhp ची ताकद 78 Nm चा टॉर्क मिळतो. एक्सशोरुम किंमत 6,13,000 रुपयांपासून सुरु होते. 

Hyundai Santro CNG देखील एक चांगला पर्याय आहे. ही कार दोन व्हेरिअंटमध्ये मिळते. यामध्ये Magna आणि Sportz हे व्हेरिअंट आहेत. यामध्ये 1.1-लीटरचे ४ सिलिंडरचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 59 bhp ची ताकद आणि 84 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते. या कारची एक्सशोरुम किंमत 6,09,900 रुपये आहे. 

मायलेजचा विचार करता मारुतीच्याच कार सर्वाधित फायद्याच्या आहेत. परंतू सुरक्षा, मायलेज आणि फिचर्सचा विचार करता टाटाची सीएनजी कार फायद्याची ठरते. ह्युंदाईची सँट्रोदेखील 30.48 किमीचे प्रतिकिलो मायलेज देते. 

Web Title: Tata Tiago CNG, Maruti WagonR CNG or Hyundai Santro? Which CNG car is affordable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.