Tata Tiago, Tigor CNG Car Launch: टाटाचा मारुतीला धोबीपछाड! ५० हजारांच्या फरकाने Tata Tiago CNG लाँच; मायलेज मात्र गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 01:54 PM2022-01-19T13:54:53+5:302022-01-19T13:55:28+5:30
Tata Tiago, Tigor CNG Car Launch Price, mileage: मारुती सुझुकीने दोन दिवस आधीच सेलेरियो सीएनजी लाँच केली होती. त्यापेक्षा खूप कमी किंमतीत टाटाने टियागो सीएनजी लाँच करून धक्का दिला आहे.
टाटा मोटर्सने बहुप्रतिक्षित टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago CNG) आणि टाटा टिग़ॉर सीएनजी (Tata Tigor CNG) कार आज लाँच केली. मारुती सुझुकीने दोन दिवस आधीच सेलेरियो सीएनजी लाँच केली होती. त्यापेक्षा खूप कमी किंमतीत टाटाने टियागो सीएनजी लाँच करून धक्का दिला आहे.
Tata Tiago iCNG ची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत 6,09,900 रुपये आहे. तर सीएनजी मॉडेलचे टॉपएंड व्हेरिअंट 7,64,900 रुपयांपर्यंत जाते. टियागो सीएनजीची डिलरशीपकडे आधीच बुकिंग सुरु झाली आहे. टाटाने या कारमध्ये सेगमेंट फर्स्ट फिचर दिले आहेत. याशिवाय कंफर्ट आणि सेफ्टीकडेही लक्ष देण्यात आले आहे. टियागोचे एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड प्लस असे चार सीएनजी व्हेरिअंट असणार आहेत.
Tata Tigor CNG ची किंमत 7.69 लाखांपासून सुरु होते. टिगॉर सीएनजी एक्सझेड आणि एक्सझेड प्लस असे दोन व्हेरिअंट उपलब्ध होणार आहेत. टाटाने अद्याप दोन्ही कारचे मायलेज किती याची माहिती दिलेली नाही. दोन्ही कारमध्ये ६० लीटरची सीएनजी टाकी देण्यात आली आहे.
बाबो! एका किलोला ३५.६० किमीचे मायलेज; मारुती सेलेरियो सीएनजी लाँच
भारतीय बाजारात सेलेरियोची किंमत 6.58 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. ही सीएनजी कार VXi व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत ही कार 45,000 रुपयांनी महाग आहे. यामध्ये K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. मारुती सुजुकी सेलेरियो S-CNG मध्ये बसविण्यात आलेले इंजिन 5300 आरपीएम वर 41.7kW ची ताकद निर्माण करते. पेट्रोलचे इंजिन 5500 आरपीएमवर 48.0kW एवढी ताकद निर्माण करते. Maruti Suzuki Celerio मध्ये 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स मिळतो. सीएनजीसाठी ६० किलोची टाकी देण्यात आली आहे.